April 29, 2025
Sugarcane workers working in the fields under harsh conditions, highlighting the need for a health task force.
Home » ऊसतोड कामगारांच्या आरोग्य समस्यांसाठी टास्क फोर्स स्थापन करावा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ऊसतोड कामगारांच्या आरोग्य समस्यांसाठी टास्क फोर्स स्थापन करावा

ऊसतोड कामगारांच्या आरोग्य समस्यांसाठी टास्क फोर्स स्थापन करावा

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या आरोग्यविषयक समस्यांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करावा, असे निर्देश  विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया प्रकरणी गठीत समितीचा अहवाल शासनास सादर करण्यात आला. त्या अनुषंगाने मंत्रालयीन विभागाने केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

ऊसतोड कामगार आणि साखरपट्ट्यातील आरोग्य सुविधा 
https://kartavyasadhana.in/view-article/saroj-shinde-on-health-issues-of-sugarcane-workers

 उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,  ऊसतोड कामगार महामंडळ कार्यरत असल्याने सामाजिक न्याय विभागाने ऊसतोड कामगार महामंडळ आणि अन्य संबंधित विभागांच्या सहकार्याने सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करावा.

या टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यास गती मिळेल. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या व समिती अहवालाच्या अनुषंगाने कार्यवाही करावी असे निर्देशही डॉ. गोऱ्हे यांनी दिले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading