शेवटच्या चेंडूवर दक्षिण अफ्रिकेच्या १० नंबरच्या फलंदाजाला एकच धाव काढता आली आणि खडतर कठीण १३ वर्षानी टिम इंडियाचे विश्व जेते पदाच ग्रहण सुटले आणि टिम इंडियाचे सतत बाद फेरीतील पराभवाचे ग्रहण सूर्याने टाळले हेच निरंतर क्रिकेट विश्वात गाजत राहिल. डेव्हिड मिलर कॅाट सूर्या बोल्ड हार्दिक,कॅचेस विन मॅचेस हे सत्य येथे शंभर टक्के सिद्ध झाले.
महादेव पंडित
२९ जूनला खेळलेल्या भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका या विश्व चषक अंतिम सामन्यात विसाव्या षटकात भारत जिंकण्याची शक्यता फक्त ३% तर दक्षिण अफ्रिका जिंकण्याची शक्यता ९७% इतकी आहे हे दूरसंचार चित्र संचावर समालोचक दाखवत होते तसेच दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी ६ चेंडूत फक्त १६ धावांची गरज होती. शेवटचे षटकं टाकण्यास हार्दिक त्याच्या धावण्याच्या मार्गावर उभा होता. समोर डावखोरा डेव्हीड मिलर हा धडाकेबाज व अतिशय कौशल्य दार बल्लेबाज दक्षिण अफ्रिकेला पहिले वाहिले विश्व विजेते पद मिळवून देण्याच्या तयारीत तीक्ष्ण धार धार नजरेने हार्दिकचा पहिला चेंडू सिमा रेषेबाहेर फटकवण्याच्या तयारीत उभा होता. तसे ६ चेंडूत फक्त १६ धावा फटकवणे डावखोर्या मिलरच्या आवाक्यात तर होतेच आणि टि २० सामन्यात हे सहज शक्य असते. हा सामना जवळ जवळ भारताच्या हातातून निसटण्याच्या बेतात होता पण हार्दिकने आपले सर्व कौशल्य व अनुभव पणाला लावून अगदी एकाग्रतेने ॲाफ स्टंपच्या थोडासा बाहेर पहिला चेंडू फुलटॅास टाकला. पहिला चेंडूच दोन्ही संघांना महत्त्वाचा होता. दक्षिण अफ्रिकेला विजयाकडे झेप घेण्यासाठी चौकार किंवा षटकार हवा होता आणि भारताला जेतेपदाला गवसणी घालण्यासाठी मिलरचा बळी हवा होता. दोघांमध्ये जोरदार निकराची लढाई चालू होती. कमकुवत ह्रदय असलेल्या प्रेक्षकांनी सामन्याचे धावते वर्णन किंवा प्रत्यक्ष प्रक्षेपण पाहू नये असे समालोचक वारंवार सांगत होते म्हणजे पहा किती अटी तटीची लढाई क्रिकेट विश्वातील दोन मातबर संघात साता समुद्रा पार बार्बाडोस मध्ये चालू होती.
मित्रहो! किती चमत्कारिक गोष्ट घडली विसाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर. धडाके बाज डावखोर्या डेव्हीड मिलरने हार्दिकचा वाईड फुलटॅास पूर्ण ताकदीने सीमा रेषे बाहेर फटकण्यासाठी जोरदार मारला खरा पण कदाचित नियतीला भारतालाच विश्व कप बहाल करायचा होता म्हणून की काय माहीत नाही, ज्या क्षेत्ररक्षकाच्या हाती चुंबकीय ओढ आहे असा सूर्य कुमार लॅागॲाफ वरून चपळाईने धावत आला आणि मिलरने फटकारलेला चेंडू दोन्ही हातात घट्ट पकडला पण उंच्यापूर्या सूर्याला आपला तोल सावरता येत नव्हता त्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता सूर्याने चपळाईने समयसूचकता वापरून पकडलेला चेंडू अलगद सिमा रेषेला पद स्पर्श न करता सिमा रेषेच्या आत अगदी पद्धतशीर कलेने मैदानात हळूवार फेकला कारण तो चेंडू पुन्हा सूर्यालाच झेलायचा होता, चेंडू पुन्हा वरुण खाली यायच्या अवधीत स्व: त सिमा रेषे बाहेर गेला आणि पुन्हा चित्त्याच्या चपळाईने आणि अति तीक्ष्ण नजरेने चेंडू वरील लक्ष न वळवता पुन्हा सिमा रेषेला पद स्पर्श न करता अलगद झेलला आणि येथेच सूर्याच्या हातात चेंडूच्या रुपाने विश्व विजेते पदाची ट्रॅाफी सूर्याला व पर्यायाने भारताला बहाल केली. पण सामना अद्यापि संपलेला नव्हता आणि जोपर्यंत क्रिकेट मॅच मध्ये शेवटचा चेंडू आपण टाकत नाही तो पर्यंत जल्लोष करायचा नाही तसेच एकाग्रतेने आणि निकराने विजयासाठी लढायचे असे सर्वांना कर्णधाराने बजावले होते. आकांक्षा व इच्छा कधीच संपवायच्या नसतात, केवळ निकराचा लढा द्यायला हिंमतीने उभे राहता आले पाहिजेत आणि हेच काम ३६० अंशात बल्लेबाजी करणार्या सूर्याने करूण दाखविले. जर मिलरचा झेल पकडण्यात एक तीळ भर आणि एका क्षणाप्रत जरी सूर्याकडून चूक झाली असती तर विजेते पद दक्षिण अफ्रिकेच्या हातात विसावले असते आणि हे कदापि नाकारता येणार नाही. जर पराभव भारताच्या पदरी विसावला असता तर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली व इतर खेळाडूंच्या निवडीबाबत आणि प्रशिक्षक व भारतीय क्रिकेट बोर्डाच्या एकुणच कार्य पद्धतीवर अनेक प्रश्न उद्भवले असते आणि हे वाद विवादाचे वादळ बराच काळ टिम इंडियावरती घोंघावत राहले असते आणि या वादळात अनेक उदयोन्मुख क्रिकेट वीरांची कारकीर्द व्यवस्थित मार्गी लागली नसती इतके हे ग्रहण भारतीय क्रिकेटसाठी वाईट होते आणि ग्रहण काळ किती वाईट असतो हे आपणा सर्वांना माहित आहेच.
सन २०११ मधील वानखेडे वरील एक दिवशीय विश्व विजेत्या पदानंतर अनेक वेळा विश्व जेतेपदानं कधी अंतिम तर कधी उपांत्य सामन्यात भारताला हुलकावणी दिली होती आणि प्रत्येक वेळी १५० करोड भारतीयांच्या पदरी निराशाच येत होती हे रोहितच्या टिम इंडियाला लागलेले ग्रहण कधी सुटणार अश्या विवंचनेत रोहित ,विराट व भारतीय संघाचे सल्लागार राहुल सर अडकलेले होते पण हार्दिकने बाकी पाच चेंडू पुन्हा त्याच हुशारीने आणि विजेतेपद हशील करण्याच्या जिद्दीने स्टंपच्या रेषेत टाकले आणि पाचव्या चेंडूवर धोका दायक वाटणाऱ्या कॅसिगो रबाडाचा सूर्याच्या सुरक्षित हस्ते बळी घेतला. आता शेवटच्या चेंडूवर विजया साठी दक्षिण अफ्रिकेला ८ धावा हव्या होत्या त्यासाठी हार्दिक ला फक्त एक लिगल चेंडू बोल्ड करायचा होता आणि अष्ठपैलू हार्दिकने ते काम एकदम फत्ते केले. शेवटच्या चेंडूवर दक्षिण अफ्रिकेच्या १० नंबरच्या फलंदाजाला एकच धाव काढता आली आणि खडतर कठीण १३ वर्षानी टिम इंडियाचे विश्व जेते पदाच ग्रहण सुटले आणि टिम इंडियाचे सतत बाद फेरीतील पराभवाचे ग्रहण सूर्याने टाळले हेच निरंतर क्रिकेट विश्वात गाजत राहिल. डेव्हिड मिलर कॅाट सूर्या बोल्ड हार्दिक,कॅचेस विन मॅचेस हे सत्य येथे शंभर टक्के सिद्ध झाले. हार्दिकच्या गोलंदाजीवर डेव्हिड मिलरचा सूर्याने सिमा रेषेवर अतिशय रोमांचक कसरत करत घेतलेला झेल हा सुवर्ण झेल (Golden Catch) म्हणूनच निरंतर क्रिकेट विश्वात नक्कीच स्मरणात राहिल.
महादेव पंडित
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
