April 22, 2025
Drip irrigation system for vine crops and tomato farming for efficient water management.
Home » कृषी सल्ला: वेल वर्गीय अन् टोमॅटो पिकाचे पाणी व्यवस्थापन
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषी सल्ला: वेल वर्गीय अन् टोमॅटो पिकाचे पाणी व्यवस्थापन

कृषी सल्ला: वेल वर्गीय अन् टोमॅटो पिकाचे पाणी व्यवस्थापन

वेल वर्गीय पिके🍉🥒🍈
पाणी व्यवस्थापन

उन्हाळी हंगामात भाजीपाला लागवडीमध्ये सिंचनाचे काटेकोर नियोजन करणे अत्यंत आवश्यक असते. सिंचन व्यवस्थापन करताना जमिनीचा मगदूर, पिकाची वाढीची अवस्था या गोष्टी विचारात घ्याव्यात. उन्हाळी हंगामात पाणी व्यवस्थापन करताना ठिबक सिंचन, तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळू शकते. तसेच प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर केल्यास बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. पाण्याची बचत करणे शक्य होते. विशेषतः फुलधारणा ते फळे काढणीच्या काळात एकसारखा पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. शक्यतो सकाळी, संध्याकाळी अथवा रात्रीच्या वेळी सिंचन करावे. भर उन्हात दुपारी सिंचन करणे टाळावे.

टोमॅटो🍅🍅
ठिबक सिंचन

टोमॅटो पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला असता ४५ टक्‍क्‍यांपर्यंत पाणी बचत व १५ ते २५ टक्के उत्पादनात वाढ मिळते. टोमॅटो पिकासाठी ठिबक सिंचन संच वापरावयाचा असल्यास, पिकाच्या लागवड पद्धतीमध्ये थोडासा बदल करणे आवश्‍यक आहे. सर्वसाधारणपणे सलग लागवड करण्यापेक्षा जोड ओळ पद्धतीचा वापर केला असता आंतरमशागत, तोडणी, फवारणी इत्यादी कामे सुलभतेने करता येतात आणि महत्त्वाचे म्हणजे ठिबक सिंचन संचाच्या खर्चात ३० टक्के बचत होते. हंगामानुसार जमिनीची पूर्वमशागत झाल्यानंतर टोमॅटोसाठी ठिबक सिंचनासाठी शेताचे सर्वेक्षण करून आराखडा तयार करावा. त्यानंतर आराखड्यानुसार ठिबक सिंचन संचाची मांडणी करावी. उच्चतम गुणवत्तेच्या संचाची निवड करावी. संकरित टोमॅटोसारख्या जवळच्या अंतराच्या पिकासाठी इनलाईन ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. इनलाईन उपनळ्या (लॅटरल) १२ मि.मी., १६ मि.मी. व्यासामध्ये उपलब्ध आहेत. टोमॅटोसाठी दोन इनलाईन नळ्यांमधील अंतर १८० ते २२५ सें.मी. ठेवावे. त्यासाठी शक्‍यतो जमिनीच्या प्रकारानुसार ६०-१०० सें.मी. किंवा ७५-१५० सें.मी. जोड ओळ (टोमॅटोच्या दोन ओळींमध्ये ६० सें.मी./ ७५ सें.मी. अंतर व दोन जोड ओळींमध्ये १२०/ १५० सें.मी.चा पट्टा) पद्धतीने लागवड करावी. ड्रीपरचा प्रवाह ४ लिटर प्रति तास व ड्रीपर्समध्ये अंतर जमिनीच्या प्रकारानुसार ३० ते ६० सें.मी. असलेल्या इनलाईन नळीची निवड करावी.

( सौजन्य – कृषक )


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading