November 21, 2024
Winners of Best Tourism Villages Competition-2024 announced by Ministry of Tourism
Home » पर्यटन मंत्रालयाकडून सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे स्पर्धा-2024चे विजेते जाहीर
पर्यटन

पर्यटन मंत्रालयाकडून सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे स्पर्धा-2024चे विजेते जाहीर

पर्यटन मंत्रालयाकडून सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे स्पर्धा-2024चे विजेते जाहीर

नवी दिल्‍ली – भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने 27 सप्टेंबर 2024 रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्त सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे स्पर्धा 2024 च्या विजेत्यांची घोषणा केली.

भारताचा आत्मा म्हणजेच देशातल्या गावांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे स्पर्धा सुरू करण्यात आली. सर्व पैलूंवर समुदाय-आधारित मूल्ये आणि शाश्वततेसाठी बांधिलकीद्वारे सांस्कृतिक आणि नैसर्गिक संपत्तीचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या गावांचा धांडोळा घेऊन त्यांची निवड करण्यावर यात भर देण्यात आला. 

वर्ष 2023 मध्ये झालेल्या पहिल्या सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे स्पर्धेत 795 गावांमधून अर्ज आले. दुसऱ्या सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे  स्पर्धेत, 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून एकूण 991 अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 36 गावांची निवड सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा 2024 च्या 8 श्रेणींमध्ये विजेते म्हणून करण्यात आली. 

विजेत्या गावात कृषी पर्यटन श्रेणीत महाराष्ट्रातील कर्दे गावाचा समावेश आहे.

36 विजेते असे –

S.NoNameState / UTCategory
1DhudmarasChhattisgarhAdventure Tourism
2AruJammu & KashmirAdventure Tourism
3KuthlurKarnatakaAdventure Tourism
4JakholUttarakhandAdventure Tourism
6KumarakomKeralaAgri Tourism
7KardeMaharashtraAgri Tourism
8HansaliPunjabAgri Tourism
9SupiUttarakhandAgri Tourism
5BaranagarWest BengalAgri Tourism
10ChitrakoteChhattisgarhCommunity Based Tourism
11Minicoy IslandLakshadweepCommunity Based Tourism
12SialsukMizoramCommunity Based Tourism
14DeomaliRajasthanCommunity Based Tourism
13Alpana GramTripuraCommunity Based Tourism
15SualkuchiAssamCraft
17PranpurMadhya PradeshCraft
18UmdenMeghalayaCraft
16ManiabandhaOdishaCraft
19NirmalTelanganaCraft
20HafeshwarGujaratHeritage
21AndroManipurHeritage
22MawphlangMeghalayaHeritage
23KeeladiTamil NaduHeritage
24Pura MahadevUttar PradeshHeritage
25DudhaniDadra and Nagar Haveli and Daman and DiuResponsible Tourism
26KadalundiKeralaResponsible Tourism
27Tar VillageLadakhResponsible Tourism
28SabarvaniMadhya PradeshResponsible Tourism
29Ladpura KhasMadhya PradeshResponsible Tourism
34AhobilamAndhra PradeshSpiritual And Wellness
30BandoraGoaSpiritual And Wellness
31RikhiapeethJharkhandSpiritual And Wellness
32Melkalingam PattiTamil NaduSpiritual And Wellness
33SomasilaTelanganaSpiritual And Wellness
35HarsilUttarakhandVibrant Village
36GunjiUttarakhandVibrant Village

पर्यटन पुरस्कार मिळवणारे कर्दे गाव –

कर्दे हे रत्नागिरी जिल्ह्यातील गाव असून स्वतंत्र ओळख असलेले हे गाव आहे आहे. स्वच्छ समुद्रकिनारे, पांढरी वाळू आणि नयनरम्य परिसर यामुळे कर्दे गाव पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. कृषी पर्यटन, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासासाठीच्या नावीन्यपूर्ण दृष्टिकोन बाळगून कर्दे गाव मार्गक्रमण करत आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading