नवी दिल्ली – पर्यटन मंत्रालयाने मे महिन्यातील पर्यटनाची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यातील महत्त्वपूर्ण बाबी पुढीलप्रमाणे:
- मे 2024 मध्ये देशात 6.00 लाख परदेशी पर्यटकांचे आगमन झाले. मे 2023 मध्ये ही संख्या 5.98 लाख इतकी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ही संख्या 0.3% वाढली आहे.
- जानेवारी ते मे 2024 या कालावधीत 40.72 लाख परदेशी पर्यटकांचे आगमन झाले. जानेवारी ते मे 2023 मध्ये ही संख्या 37.32 लाख इतकी होती. 2023 च्या तुलनेत यंदा 9.1% वाढ झाली आहे.
- मे 2024 मध्ये 17,762 कोटी रुपये इतके परकीय चलनाद्वारे उत्पन्न प्राप्त झाले. मे 2023 मधील 17,206 कोटी रुपये उत्पन्नाच्या तुलनेत यंदा त्यात 3.23% वाढ झाली आहे.
- जानेवारी ते मे 2024 या कालावधीत परदेशी चलन उत्पन्न 1,08,362 कोटी रुपये झाले. जानेवारी ते मे 2023 या कालावधीतील 88,441 कोटी रुपये उत्पन्नाच्या तुलनेत यंदा 22.52% वाढ झाली आहे.
आकडेवारीतील हे कल एकूण आर्थिक वाढ आणि देशातील पर्यटन क्षेत्राच्या विकासावरील सकारात्मक प्रभाव अधोरेखित करतात. परदेशी पर्यटकांचे आगमन आणि परकीय चलन उत्पन्नातील वाढ पर्यटन व्यवसायाची भक्कम स्थिती व या उद्योगाचा विस्तार दर्शवते.
केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.