March 19, 2024
Small use but large effect article by Rajendra Ghorpade
Home » वापर अल्पच, पण तो गुणकारी
विश्वाचे आर्त

वापर अल्पच, पण तो गुणकारी

अनेक पदार्थ आहेत जे जेवणाची रुची वाढवतात. त्याबरोबरच त्याचे अन्य फायदेही आहेत. त्यांच्या वापराने जेवणाची रुची वाढते. वापर किती आहे याला महत्त्व नाही. तर त्या पदार्थाच्या गुणधर्मांना महत्त्व आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६

आंगे सानें परिणामें थोरू । जैसें गुरुमुखीचें अक्षरु ।
तैशी अल्पी जिही अपारू । तृप्तिराहे ।। १२९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा

ओवीचा अर्थ ः ज्याप्रमाणे गुरुने केलेल्या उपदेशाचे शब्द (महावाक्य) दिसण्यांत थोडकेच असतात, परंतु त्याचा परिणाम मोठा असतो, त्याप्रमाणे जो आहार दिसावयास अगदी थोडा असतो परंतु, जो सेवन केला तर कल्पनेबाहेर पूर्ण तृप्त होतो.

आहारात अगदी अत्यल्प वापर असतो, पण त्याच्या वापराशिवाय आहाराला चवच येत नाही. असा पदार्थ म्हणजे मीठ. जेवणात मीठ नसेल तर त्या जेवणाला काहीच अर्थ उरत नाही, बेचव जेवणाचा घासही गळ्यातून उतरत नाही. मिठाचा अगदी अत्यल्प वापर असतो, पण तो आवश्यक असतो. असे अनेक पदार्थ आहेत ज्याच्या आहारात अल्प वापरही जेवणाची रुची वाढवतो. लोणचे ताटात असेल तर इतर पदार्थांसोबत खाताना त्या पदार्थांची रुची वाढते. म्हणजेच असे अनेक पदार्थ आहेत जे जेवणाची रुची वाढवतात.

चहामध्ये आल्याचा थोडासा वापरही चहाचा स्वाद वाढवतो. असे नाही हे पदार्थ नुसतीच चव वाढवतात पण त्याचे फायदेही आहेत. आरोग्यासाठी त्याचा वापर उपयुक्तही आहे. आल्यामध्ये विषाणू विरोधी गुणधर्म आहेत. दररोज आल्याचे पाणी प्यायले तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळेच त्याचा वापर चहासोबतही फायदेशीर ठरतो.

लसणाचा वापरही जेवणात उपयुक्त ठरतो. लसनामध्ये विषाणूविरोधी गुणधर्म आहेत. त्याच्या रोजच्या वापराने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. असे अनेक पदार्थ आहेत जे जेवणाची रुची वाढवतात. त्याबरोबरच त्याचे अन्य फायदेही आहेत. त्यांच्या वापराने जेवणाची रुची वाढते. वापर किती आहे याला महत्त्व नाही. तर त्या पदार्थाच्या गुणधर्मांना महत्त्व आहे.

सद्गगुरु सुद्धा छोटासाच कानमंत्र देतात पण त्यांचा हा मंत्र, उपदेश सदैव आपल्याला उपयोगी पडतो. गुरुमंत्र तर एकच शब्दाचा असतो. पण त्याच्या नित्य स्मरणाने, साधनेने आपले आयुष्य सुखकर होते. साधनेचे अनेक फायदे आहेत. आपल्या आरोग्यापासून ते आपल्या आयुष्यवाढीवरही त्याचा परिणाम होतो. कारण साधनेने मिळणारा आनंद आपले आरोग्य सुधारतो. आपल्या मनाला उर्जा देतो. ही उर्जा आपल्या मनाला स्फुर्ती देते. आपल्या जीवनात यासाठीच गुरुमंत्राचे महत्त्व आहे. जीवनाचा खरा अर्थ यातून समजतो. म्हणून मंत्र जरी छोटा असला तरी आपले आयुष्य बदलवणारा आहे. हे विचारात घ्यायला हवे.

जेवणात जसे हे छोटे छोटे पदार्थ उपयुक्त आहेत. त्याने तृप्ती मिळते. तसेच गुरुमंत्राचा नित्य वापरही जीवनासाठी उपयुक्त आहे. त्याचा परिणाम खूप मोठा आहे. साधनेने जीवनात सावधानता येते. सदैव सावध राहील्याने होणाऱ्या चुका कमी होतात. अवधान असेल तर गुरुंच्या छोट्या छोट्या उपदेशाची अनुभुती येते. यातूनच पुढे आत्मज्ञानाची अनुभुती येते. समाधी अवस्थाही प्राप्त होते. यासाठीच गुरुमंत्रांचे गुणधर्म कळायला हवेत.

Related posts

अश्वमेध ग्रंथालय पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

सौंदर्य !…

औटघटकेची युगांतरंमध्ये अस्तित्वशोधाची नित्य नवी रूपे

Leave a Comment