December 14, 2024
Sarbanand Sonowal comment scheme to promote lighthouse tourism
Home » दीपगृह पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना – सर्बानंद सोनोवाल
पर्यटन

दीपगृह पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना – सर्बानंद सोनोवाल

देशातल्या दीपगृह पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना आखण्यात येत असल्याची केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची माहिती

विझिनजाम, केरळ – केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली आज केरळमधील विझिनजाम येथे दीपगृह पर्यटनाला चालना देण्यासाठी संबंधितांची बैठक झाली. केंद्र सरकारच्या बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दीपगृह आणि लाइटशिप्स महासंचालनालयाने (डीजीएलएल) ही बैठक आयोजित केली होती. ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक सौंदर्य  अशा दृष्टीकोनातून दीपगृहांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची संकल्पना राबवणारी धोरणे आखणे हे या बैठकीचे उद्दिष्ट होते. दीपगृहावर वृद्ध आणि दिव्यांग स्नेही पर्यटन सुविधा सुसज्ज करणार, असे त्यांनी सांगितले. 

एप्रिल ते जून 2024 दरम्यान 500,000 हून अधिक पर्यटकांनी दीपगृहांना भेट दिली, असे सोनोवाल यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेनुसार या आयकॉनिक सागरी दीपगृहांचे आकर्षक पर्यटन स्थळांमध्ये रूपांतर करण्याचा दृष्टीकोन त्यांनी स्पष्ट केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदर्शी दृष्टिकोन या संमेलनासाठी मार्गदर्शक ठरला असे ते म्हणाले. या दीपगृह पर्यटनाला चालना देऊन या वास्तूंना पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची सरकारची वचनबद्धता सोनोवाल यांनी विशद केली.

दीपगृहांची पर्यटन क्षमता सिद्ध करत, त्यांच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक सौंदर्य  यावर भर देणे हा या बैठकीचा उद्देश होता. सरकारी संस्था, पर्यटन संस्था, स्थानिक समुदाय आणि खाजगी क्षेत्रातील भागधारकांमध्ये सहयोग आणि भागीदारीतून हा उद्देश साध्य होईल.

भारताला आपल्या भौगोलिक विविधतेसह आपली संस्कृती, सामाजिक मुल्ये  आणि इतिहास यांचा संगम दाखवता येतो. सागरी मार्गदर्शनाचे साधन म्हणून काम करण्याबरोबरच दीपगृहांचे एक ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे त्यांचे पर्यटनस्थळांमध्ये रूपांतर करण्याची संधी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिशील नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दीपगृहांचा पर्यटन स्थळे म्हणून विकास आणि प्रचार करण्याचा निर्णय घेतला. समृद्ध सागरी वारशाचे जतन करणारा हा निर्णय आहे. भारताच्या किनारपट्टीच्या आर्थिक विकासासाठी आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी दीपगृहांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मंत्रालय वचनबद्ध आहे, असे ते म्हणाले.

या बैठकीत दीपगृहांचे पर्यटन सुविधांमध्ये रूपांतर करण्याच्या धोरणांवर भर देण्यात आला. दूरदर्शी एमआयव्ही 2030 उपक्रमांतर्गत संचालनालय सक्रियपणे संपूर्ण भारतात दीपगृह पर्यटनाला प्रोत्साहन देत आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading