भीती
लोटला किती काळ
देश स्वतंत्र होऊनी
परी भीती येथली
नाही संपली अजुनी…
अबलांना तुडवीले जातेय
भोगदासी समजूनी
किती विटंबना देहाची
तुकडे,तुकडे करुनी….
सोसतेय घाव अजुनही
नारी स्वातंत्र्यात
नाही तिला संरक्षण
जगतेय ती पारतंत्र्यात…
वाली तिजला हवाय
कृष्ण सखा वस्त्र पुरवणारा
अवतरु दे भुतलावर
षंढांना अद्दल घडवणारा….
आंदोलन, भाषणे कुचकामी
तेवढ्यापुरतेच पेटून उठणारे
अशी शिक्षा व्हावी नराधमांना
फोडावे डोळे, वासनांध बघणारे….
चिमुकल्यांचे हसते खेळते
जग क्षणात उद्ध्वस्त झाले
विकृती कसली माणसात
राक्षस जन्मास आले….
सौ सीमा मंगरूळे तवटे वडूज
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.