पाऊस अन् गारपीटीची शक्यता
आजपासून पाच दिवस म्हणजे मंगळवार १० जानेवारी पर्यन्त संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळलेले वातावरण राहून तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ गडगडाटीसह अवकाळी पावसाची शक्यता जाणवते.
विशेषतः खान्देश व लगतच्या नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापुर जिल्ह्यात मंगळवारी ९ तारखेला पावसाची ही शक्यता अधिक जाणवते.
तर ह्या एके दिवशी केवळ ९ तारखेला पश्चिम मध्यप्रदेश उपविभागाबरोबरच महाराष्ट्रातील लगतच्या खान्देशातील शिरपूर शहादा चोपडा यावल रावेर तालुक्याच्या तुरळक भागात झालीच तर तुरळक ठिकाणी किरकोळ गारपीटीची शक्यताही नाकारता येत नाही.
११ जानेवारीनंतर थंडीची शक्यता
ढगाळ व पावसाळी वातावरण ओसंरल्यानंतर म्हणजे गुरुवार दि.११ जानेवारी, अमावस्येपासून, उत्तर भारतातून उत्तर व ईशान्य दिशेकडून थंड कोरडे वारे घुसण्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रात पुन्हा थंडीची शक्यता जाणवते.
७ ते १० जानेवारीपर्यन्तच्या ४दिवसात महाराष्ट्रात मात्र पहाटेचे किमान तापमान हे १६ डिग्री से.ग्रेड(म्हणजे सरासरीपेक्षा ४ डिग्रीने अधिक) व दुपारचे कमाल तापमान २८ डिग्री से. ग्रेड(म्हणजे सरासरीइतके) दरम्यानचे असु शकते, असे वाटते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.