November 21, 2024
Damasa Sahitya awards announced
Home » दमसाचे साहित्य पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

दमसाचे साहित्य पुरस्कार जाहीर

डॉ.माणिकराव साळुंखे ,समीर गायकवाड, वनिता जांगळे, विठ्ठल खिल्लारी यांना दमसाचे ग्रंथ पुरस्कार जाहीर

कोल्हापूर – दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या (दमसा) वतीने देण्यात येणाऱ्या २०२३  मधील ग्रंथ पुरस्कारासाठी डॉ. माणिकराव साळुंखे, समीर गायकवाड, वनिता जांगळे, विठ्ठल खिल्लारी, मुबारक उमराणी  यांच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती दमसाचे कार्याध्यक्ष प्रा. दि. बा. पाटील, कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी दिली आहे.

पुरस्कार प्राप्त पुस्तके आणि लेखकांची नावे अशी

देवदत्त पाटील पुरस्कार यंदा सवळा या विठ्ठल खिल्लारी यांच्या कादंबरीस तर शंकर खंडू पाटील पुरस्कार वसप या महादेव माने यांच्या कथासंग्रह देण्यात आला आहे.

अण्णा भाऊ साठे पुरस्कार झांबळ या समीर गायकवाड या कथेस तर .कृ.गो.सूर्यवंशी पुरस्कार विद्येच्या प्रांगणात या माणिकराव साळुंखे यांच्या पुस्तकास संकीर्ण या श्रेणीमध्ये देण्यात आला आहे.

शैला सायनाकर पुरस्कारासाठी वनिता जांगळे यांच्या तिच्या जगण्याची कविता होताना या कवितासंग्रहाची तर चैतन्य माने पुरस्कारासाठी प्रथम प्रकाशित जोखड या मुबारक उमराणी यांच्या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली आहे.

बालवाड्मय पुरस्कार प्रतिभा जगदाळे यांच्या हसरी शाळा  या पुस्तकास दिला आहे.

 विशेष पुरस्कारामध्ये वसंत केशव पाटील पुरस्कार  शिक्षण संवाद तिरकस आणि चौकस या राजेंद्र कुंभार यांच्या पुस्तकास दिला आहे. तर किरण शिंदे पुरस्कार कहाणी एका सोंगाड्याची या संपत पार्लेकर या पुस्तकास दिला आहे.

अन्य विशेष पुरस्कारामध्ये हटके सोचो – दीपक कुलकर्णी, महात्मा गांधी आणि त्यांचे  सांगाती – दशरथ पारेकर, नंदा पारेकर, संतांचा तो संग नव्हे भलतैसा – महावीर अक्कोळे, प्रतिसरकार: शिराळा पेटा – विजयकुमार जोखे, पासष्टीचे  अभंग – शाहीर पाटील, गावगोष्टी – बाबुराव बन्ने, बॅ. बाळासाहेब खर्डेकर – बी. जी. मांगले, ऱ्हासपर्व – विद्यासागर अध्यापक, हिंगणमिठ्ठा – उत्तम फराकटे, शब्दक्रांतीचे शाहिरी पर्व – प्रदीप कांबळे, धर्मनिरपेक्षता – सचिन कुसनाळे, महाराष्ट्रातील शास्त्रज्ञ -उषा खंदारे, काय नवाल इपईलं – संपादक अशोक चोकाककर, चंद्र नगरीचा शब्द – अशोक दास, वळणं आणि वळण – जयवंत जाधव, कवितेची वही – शालिनी पवार, प्रेम म्हणजे – सुषमा शितोळे, गाभाऱ्यातील सुहास – अभय जाधव, माझ्या अंगणातील गीताई – किरण पाटील, ऐकीबेकी – विठ्ठल वडाम, लाही – अनिल घस्ते, आदिवासी संस्कृती – शशिकांत अन्नदाते, कावेरी – अपर्णा पाटील, माणसाची किंमत – रवींद्र पाटील, सर्जन विसर्जन – विक्रम वागरे, खस्ता – पी. एस. पाटील या पुस्तकांचा व लेखकांचा समावेश आहे.

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांसह सीमाभागातील मराठी लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते २०२३ या वर्षातील ग्रंथ पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून डॉ. विजय चोरमारे, डॉ. नंदकुमार मोरे, वसंत खोत, सुप्रिया वकील आणि गौरी भोगले यांनी काम पाहिले. पुरस्कार वितरण समारंभ लवकरच मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे दमसाचे कार्याध्यक्ष प्रा. दि. बा. पाटील, कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी कळवले आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading