राजन कोनवडेकरांची एक भाव कविता…….
. || गोकूळी हवा धूंद आहे ||
मूरलीच्या सुरातूनी
वाहतो मुकूंद आहे |
गोकूळी हवा धूंद आहे ||
कुजबुजे अलगूज कांहीं
गूज त्या ओठास ठावे |
विसरुनी वाटा रीतिच्या
राधिका बेबंद धावे ||
भृंग का वेडावला
फुलांत या मकरंद आहे ||
चराचर व्यापलेला
सावळा सूर झाला |
गुंगली गायी गुरे
विसरुनी वासराला |
धुंदल्या दाही दिशा
धुंदला आनंद आहे ||
शोधूनी सापडेना
कोठूनी साद येते
बावरी प्रेमवेडी
आंधळी धाव घेते |
भरुनी आसमंत सारा
मोगरी गंध आहे |
गोकूळी हवा धूंद आहे ||
कवी – राजन कोनवडेकर
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.