November 21, 2024
Jayprakash Pradhan Books on Bhatakanti
Home » भटकंतीवरील आगळीवेगळी पुस्तके…
पर्यटन

भटकंतीवरील आगळीवेगळी पुस्तके…

कोणतंही बेट म्हटलं की आपलं कुतूहल चाळवतं आणि जगात तर अशी अनेक बेटं आहेत जी अक्षरश : स्वप्ननगरी वाटावीत… अशाच काही अनोख्या आणि अपरिचित बेटांची आपल्याला सैर घडवून आणत आहे प्रधान दाम्पत्य !

विशेष गर्दी नसलेल्या पण वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या बेटांवर जाऊन राहणं, तेथील निसर्ग भरभरून अनुभवणं, तेथील स्थानिक खाद्य-पेयांचा आस्वाद घेणं, घेणं तेथील वेगळी संस्कृती, प्रथा समजून हा प्रधान दाम्पत्याचा आवडीचा उद्योग…. गाठीला असलेला हा अनुभव रसिक वाचकांसमोर खुला करून प्रधान ती बेटं, तो प्रदेश डोळ्यासमोर उभा करतात. अशा तऱ्हेच्या फिरण्यातून पर्यटनाचा एक वेगळा आनंद कसा मिळू शकतो याची एक नवी दृष्टी ते पर्यटकांना भटकंती सप्तरंगी बेटांची या पुस्तकातून देतात .

कोणत्या बेटांची सफर आहे या पुस्तकात ? ऐकलं आहे का तुम्ही या बेटांबद्दल ?

  • स्पेनमधले बॅलेॲरिक आणि कॅनरी आयलंडचे अप्रतिम समुद्रकिनारे
  • ११५ लहान – मोठ्या बेटांचा समूह सेशेल्स
  • जागतिक पर्यटकांचं हॉट डेस्टिनेशन हवाई बेटं
  • ग्रीस मधली पांढरी निळी बेटं लहान – मोठ्या १७,५०० बेटांचा मिळून झालेला व प्राचीन वारसा लाभलेला इंडोनेशिया
  • नयनरम्य निसर्गसौंदर्याने नटलेली इटलीमधील लोकप्रिय बेटं ..

अशा अनेक बेटांची सप्तरंगी सफर…

आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान यांच्या भटकंतीवरील पुस्तकाबद्दल जाणून घ्या त्यांच्याच कडून…

तब्बल ८३ देश भटकलेले आणि पर्यटनाची भिंगरी लागेलेले प्रधान दाम्पत्य करोना काळात जणू ‘हाऊस अरेस्ट’ मध्येच होते… चार भिंतीत अडकले होते खरे, मात्र वाचकांना भटकंतीचे चार अनुभव सांगण्यासाठी त्यांनी त्या काळात त्यांची लेखणी सरसावली आणि २०१ ९मध्ये केलेल्या ४० दिवसांच्या चित्तथरारक भटकंतीला शब्दरूप देण्याचं काम केलं. जयप्रकाश प्रधान त्यांच्या या पुस्तकातून वाचकांना आणि पर्यटकांना एक सुखद सफर घडवून आणताहेत… भटकंती आगळ्या – वेगळ्या देशांची!

कोणत्या देशांची भटकंती आहे या पुस्तकात ?

  • जॉर्जियामधील ऑटम कलर्स , तेथील प्राचीन अवशेष , स्टॅलिनचं जन्मगाव
  • अझरबैजानमधील इचेरी शेहेरसारखा जुना भाग आणि दुसरी दुबई होण्याच्या मार्गावरील नवा भाग
  • अर्मेनिया हा विविध युद्धांना बळी पडलेला चिमुकला देश
  • नागोनों काराबाख हा डोंगराच्या कुशीत विसावलेला नयनरम्य देश
  • युरोपची सांस्कृतिक राजधानी समजला जाणारा स्पेनमधील मलगा प्रांत आणि स्मार्ट सिटी बार्सिलोना
  • प्राचीन अवशेषांनी नटलेला ग्रीस
  • फ्रान्स आणि स्पेनच्या सीमांमध्ये लपलेला टिकलीएवढा देश अँडोरा

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading