📚🏆📚🏆📝🏆📚🏆📚
कोवाड (ता. चंदगड) : येथील साहित्यिक कै. पांडुरंग कुंभार प्रतिष्ठानतर्फे दिले जाणारे साहित्य पुरस्कार – २०२५ जाहीर करण्यात आले आहेत. राज्यभरातून आलेल्या पुस्तकांमधून प्रतिष्ठानने ठरवलेल्या निकषांनुसार परीक्षकांनी निवड प्रक्रिया पार पाडली. ललित लेखन आणि चरित्र या दोन विभागांत प्रत्येकी तीन पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे प्रमुख अनंत पांडुरंग कुंभार, संजय पांडुरंग कुंभार, विनायक पांडुरंग कुंभार यांनी दिली आहे.
‘ललित लेखन’ विभागात प्रथम पुरस्कार डॉ. सुनंदा शेळके यांच्या प्रतिभेच्या पारंब्या या पुस्तकास देण्यात आला आहे. ५००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, गौरवपत्र शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. द्वितीय पुरस्कार श्रीराम ग. पचिंद्रे यांच्या सारांश या पुस्तकास देण्यात आला आहे. २००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप असून तृतीय पुरस्कार सतीश तिरोडकर यांच्या अनुभवे अंतरी जैसे..या पुस्तकास देण्यात आला आहे. १००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
‘चरित्र विभाग’ विभागात प्रथम पुरस्कार केशव बा. वसेकर यांच्या वसा केशवाचा या पुस्तकास देण्यात आला आहे. ५००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, गौरवपत्र शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. द्वितीय पुरस्कार जयवंत जाधव यांच्या वळणं आणि वळण या पुस्तकास देण्यात आला आहे. २००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप असून तृतीय पुरस्कार डॉ. मधुकर येवलुजे यांच्या समाज मनाची माणसं.. या पुस्तकास देण्यात आला आहे. १००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
