September 8, 2024
Rain Farm and Crop Nice to see Chandrashekhar Kasar Poem
Home » पाऊस – शेती – पीक वाह.. वा.. वाह.. वा..
कविता

पाऊस – शेती – पीक वाह.. वा.. वाह.. वा..

पाऊस – शेती – पीक वाह.. वा.. वाह.. वा..

पाऊस – शेती – पीक वाह.. वा.. वाह.. वा.. धुळे येथील चंद्रशेखर प्रभाकर कासार चांदवाडकर यांची कविता..

एक दिवस माझ्याही
सुपीक डोक्याच्या शेतीत
विचारांचा पाऊस पडेल

मग मी करेन पेरणी
शब्दाशब्दांची
अक्षरे जुळवून
ज्ञानार्जनाने मिळवलेल्या
खत पाण्याने मशागत करून
उगवेल अंकुर साहित्याचा
डोक्याचा वाफा झाल्यावर

त्यावर विवेक बुद्धीच्या
सुवर्ण किरणांची ऊब देऊन
सुंदर, स्वच्छ, सुवासिक
निर्मळ, ताजे, रसदार हरित
साहित्याचे पीक घेईन

घेतील सारे त्याचा स्वाद
आवडीने करतील प्रशंसा
मिळेल प्रसिद्धी
माझ्या सुपीक डोक्याच्या
शेतीतील पिकाला
म्हणतील सारे
वाह… वा… वाह… वा…

चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर ,धुळे.
७५८८३१८५४३.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

शेतकरी संघटना अन् मराठी साहित्याचे अनुबंध

आम्ही विश्व लेखिका कोकण विभाग अध्यक्षपदी सुनेत्रा जोशी

नशीब….. नशीब……. म्हणतात ते हेच का ?

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading