कोल्हापूर येथील संत गाडगे महाराज अध्यासनातर्फे राज्यस्तरीय संत ग्रंथ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. तसेच करवीर साहित्य परिषदेतर्फेही आयोजत स्पर्धेचे ग्रंथ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण २० फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथे करण्यात येणार आहे अशी माहिती प्राचार्य रा. तु. भगत यांनी दिली आहे.
संत गाडगे महाराज अध्यासनतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये संत साहित्याचा समावेश असून संत चरित्र, कथा, कादंबरी, काव्य, संशोधन आणि संकीर्ण ग्रंथांचा यामध्ये समावेश आहे. रोख एक हजार रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
संत ग्रंथ पुरस्काराचे विजेचे असे –
प्रथम क्रमांक (विभागून) :
१) युगदृष्टा स्वामी चक्रधर : डॉ. बाबासाहेब बीडकर
२) मैत्री श्रीदासबोधाशी : डॉ. वसुंधरा बनहट्टी
३) मानव जीवन रहस्य : डॉ. सुधीर पांडे
४) ज्ञानज्योती : डॉ. ज्योती रहाळकर.
विशेष पुरस्कार:
१) स्वधर्म विचार : डॉ. विजय बाणकर
२) सत्यशोधक महात्मा बसवेश्वर : प्रा. किसनराव कुराडे
३) भक्तिपुष्पे : सौ. मालती डांगे
४) प्रार्थना पुष्पार्पण : सौ. आरती भागवत
५) संत गाडगेबाबांचे व्यक्तिमत्त्व : बंडोपंत राजेश्वर बोढेकर
६) जगावेगळा कीर्तनकार : बबन शिंदे
उत्तेजनार्थ पुरस्कार ः
१) संत ज्ञानेश्वरांची सनद : आनंद उपळेकर
२) श्री संत सेवा : प्रकाश केळुसकर
३) श्री दिगंबर स्वामी चरित्र : विष्णू पावले
करवीर साहित्य परिषदेचे पुरस्कार असे –
कादंबरी विभाग: प्रथम क्रमांक (विभागून):
१) पुंगरु : गणपत हरी पाटील
२) इपळाप : नंदू साळोखे
कादंबरी विभागतील उत्तेजनार्थ पुरस्कार :
१) वढाळ मन : राजाराम तावडे
२) आम्ही जगाचे कैवारी : विजय पाटील
कथा विभाग :प्रथम क्रमांक (विभागून):
१) कौल : जयवंत जाधव
२) प्रकाश ज्योत : मनोहर मोहिते
कथा विभागातील उत्तेजनार्थ पुरस्कार :
१) खजिना : प्रेम पाटील
काव्य विभाग: प्रथम क्रमांक (विभागून) :
१) अनुग्रहित : डॉ. दिलीप पां. कुलकर्णी
२) गजल प्रेमऋतुची : प्रसाद कुलकर्णी
विशेष पुरस्कार:
१) सृजनरंग गझलेचे : डॉ. संजीवनी तोफखाने
उत्तेजनार्थ पुरस्कार असे :
१) समुद्रमंथन : कालिंदी कुलकर्णी
२) आयुष्य झेलताना : तानाजी आसबे
संकीर्ण विभाग : प्रथम क्रमांक (विभागून):
१) राजर्षी शाहू महाराज : प्राचार्य डॉ. जे. के. पवार
२) जय भान : डॉ. बी. एम्. हिर्डेकर
३) सृजन गंध : डॉ. चंद्रकांत पोतदार
४) बापू : डॉ. सुनीलकुमार लवटे
५) अर्जुनाचे एकलव्यायन : डॉ. अर्जुन कुंभार
विशेष पुरस्कार:
१) जडण घडण : अनिल ईश्वरा चव्हाण
२) मोगरा फुलला : हेमा गंगातीरकर
३) ओंजळीतील फुले : प्रा. रसुल सोलापुरे
४) अलौकिक : जयश्री दानवे
उत्तेजनार्थ पुरस्कार :
१) आठवणींच्या सागरातील मोती : विलास जाधव
२) अमरवेल : अमर शामराव मुसळे
३) आदर्श शिक्षक : पी. एन्. देशपांडे
४) संघर्ष गाथा : किरण चव्हाण
५) माध्यमिक शाळा प्रशासन आणि गुणवत्ता विकास : अरविंद देशपांडे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
2 comments
मला या पुरस्कारात सहभागी व्हायचे आहे.
नामामृत चरित्र ग्रंथ प्रकाशित झाला आहे माझा.
सर्व पुरस्कार प्राप्त साहित्यिक मंडळींचे खूप खूप हार्दिक अभिनंदन.