September 8, 2024
Screening of short film Madhubala at Shivaji University on Monday
Home » ‘मधुबाला’ लघुपटाचे सोमवारी शिवाजी विद्यापीठात स्क्रीनिंग
काय चाललयं अवतीभवती

‘मधुबाला’ लघुपटाचे सोमवारी शिवाजी विद्यापीठात स्क्रीनिंग

‘मधुबाला’ लघुपटाचे सोमवारी शिवाजी विद्यापीठात स्क्रीनिंग

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात सुरू असलेल्या बी. ए. फिल्म मेकिंग कोर्सचा प्रारंभ सोमवारी ( ता. 15 जुलै ) रोजी होत आहे. यानिमित्ताने दुपारी दोन वाजता ख्यातनाम स्टोरीबोर्ड रायटर, चित्रकार आणि दिग्दर्शक स्वप्नील पाटील यांच्या ‘मधुबाला’ या लघुपटाचे स्क्रीनिंग होणार आहे. त्यानंतर श्री. पाटील ‘लघुपट निर्मितीची प्रक्रिया’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.

शिवाजी विद्यापीठात चालू शैक्षणिक वर्षापासून बी. ए. फिल्म मेकिंग हा बारावीनंतर तीन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी राज्याच्या विविध भागातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या अभ्यासक्रमाच्या निमित्ताने प्रथमच विद्यापीठीय स्तरावर चित्रपटाचा शास्त्रीय अभ्यास, अध्ययन आणि अध्यापन होणार आहे. याचाच एक भाग म्हणून स्वप्नील पाटील यांच्या ‘मधुबाला’ या लघुपटाचे विभागात स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून सिनेरसिक नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाच्या बी. ए. फिल्म मेकिंग कोर्सचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी दिली.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Video : राऊतवाडी धबधब्याचे मनमोहक सौंदर्य

नाशिक जिल्ह्यातील साठएक गडांचा जागर

पाटगावचे मधाचे वैभव पुन्हा बहरले

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading