काय कमावलं काय गमावलं ?
अध्यक्ष महोदय, मुद्याचं बोला
राजकारणातल्या धंद्याचं बोला
उद्योग सारे पळवले
सुरतने महाराष्ट्र लुटला
कोण नोंदवणार एफआयआर
कोण चालवणार खटला
किती देणार झोल्यावर झोला
अध्यक्ष महोदय, मुद्याचं बोला
राजकारणातल्या धंद्याचं बोला
सरकारी लाडक्या बहिणीचा
कच्चा आहे धागा
बेरोजगार सावत्र भावाला
स्मशानी दिली जागा
अग्नीवीर भैय्याचा किती केला गलबला
अध्यक्ष महोदय, मुद्याचं बोला
राजकारणातल्या धंद्याचं बोला
न फुटणारेही खोक्यावर उद्ध्वस्त केले
संत्र्याच्या झाडाला, कलम ऊसाचे केले
तुळशीवृंदावनात रोप गांज्याचे पोसले
राम येऊनही दूध अयोध्येत नासले
महाराष्ट्राचा सुपुत्र चेला गुजराती झाला
अध्यक्ष महोदय, मुद्याचं बोला
राजकारणातल्या धंद्याचं बोला
इतिहासाच्या दाखल्यावरुन
गांधी नेहरु हटले नाहीत
संसद गळकी, मंदिर गळके
तिथे का नेहरु भेटले नाहीत
बुद्धिवंत चाणक्य अक्कलशून्य झाला
अध्यक्ष महोदय मुद्याचं बोला
राजकारणातल्या धंद्याचं बोला
वार्याने पुतळा पाडला
एकाची साक्ष आहे
तिघांनी तिजोरी फोडली
जनतेचा कपाळमोक्ष आहे
काय कमावलं काय गमावल
हिशोबाचा कडेलोट झाला
अध्यक्ष महोदय मुद्याचं बोला
राजकारणातल्या धंद्याचं बोला
शिवाजी सातपुते 9075702789
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.