‘ आज मध्य रात्रींनंतर तीव्र च.वादळ आदळणार ‘
१-चक्रीवादळ स्थिती –
आज गुरुवार दि. २४ ऑक्टोबर च्या मध्यरात्रींनंतर ते शुक्रवार दि. २५ ऑक्टोबर च्या सकाळ पर्यन्त ‘ दाना ‘ नावाचे च.वादळ ओरिसातील केंद्रपाडा जिल्ह्यातील भितरकणिका व धमरा शहरादरम्यान ताशी १०० ते ११० किमी. वेगाने आदळण्याची शक्यता जाणवते. येथील क्षेत्र हे खारफुटी जंगलाचे आहे. त्यामुळे जीवित हानिची शक्यता कमी वाटते. ह्या परिसरातील उथळ समुद्रामुळे, समुद्रसपाटी उंची ४ ते ५ मीटर आहे.
२- ठिकाण –
भितरकणिका ठिकाण हे १४५ चौ.कि.मी.मध्ये पसरलेली आहे, असंख्य खाड्या आणि मातीच्या ढिगाऱ्यांनी नटलेले आहे. हे नदीच्या प्रदेशाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. ब्राह्मणी आणि बैतरणी नद्या भितरकणिकाजवळ बंगालच्या उपसागराला मिळतात आणि समुद्रातून आलेल्या भरतीमुळे वनस्पती आणि प्राण्यांसाठी एक अनोखे जग निर्माण झाले आहे. भितरकनिकामध्ये भारतातील धोक्यात असलेल्या खाऱ्या पाण्याच्या मगरींची सर्वात मोठी येथे लोकसंख्या आहे.
३- वादळाचे नांव –
च.वादळाला ‘ दाना ‘ नांव हे यादीत ‘ कुवेत ‘ राष्ट्राने सुचवलेले अरेबिक भाषेतील नांव असुन ‘मनाचा मोठे पणा ‘ किंवा ‘उदरता’ किंवा ‘औदाऱ्य ‘ असा त्याचा मराठीतील अर्थ आहे.
४- महाराष्ट्राला धोका नाही –
महाराष्ट्राला ह्या चक्रीवादळापासून कोणताही धोका नाही. वादळ आदळल्यानंतर त्याची आर्द्रता अवशेष उत्तरेकडे सिक्कीम कडे तर काही अवशेष महाराष्ट्रातील गडचिरोली चंद्रपूर परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगलीपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे त्या भागात रविवार दि. २७ऑक्टोबर ला केवळ ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरण जाणवते.
माणिकराव खुळे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.