आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
वातावरण निवळले, हळूहळू थंडी वाढणार !
ऊबदारपणा कायम – आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे गुरुवार दि. २ जानेवारीपर्यंत ऊबदार वातावरण हळूहळू कमी होत जाईल.
थंडी वाढणार –
शुक्रवार दि. ३ जानेवारी पासून त्यापुढील पाच दिवसासाठी म्हणजे मंगळवार दि. ७ जानेवारी पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात थंडी जाणवण्याची शक्यता आहे.
त्यातही विशेषतः उत्तर महाराष्ट्र व उत्तर विदर्भातील नंदुरबार धुळे जळगांव नाशिक नगर छ.सं.नगर अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया ह्या जिल्ह्यात त्या पाच दिवसात थंडीचा प्रभाव अधिक राहील, असे वाटते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.