March 30, 2023
open-free-library-in-dahisar-anandvan-garden
Home » दहिसरमधील आनंदवन उद्यानात पुस्तकांचा खजिना
काय चाललयं अवतीभवती

दहिसरमधील आनंदवन उद्यानात पुस्तकांचा खजिना

दहिसरमध्ये पुस्तकांचा खजिना

आनंदवन उद्यानात मोफत वाचनालय

मुंबई : दहिसर पूर्व विभागातील नागरिकांना विशेष करून तरुण पिढीला वाचनासाठी मोफत पुस्तके उपलब्ध व्हावी, यासाठी आनंदवन उद्यानात मोफत खुले वाचनालय सुरू करण्यात आले आहे. मोफत वाचनालय वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून, दहिसर येथे सुरू केलेले हे २०वे मोफत वाचनालय असल्याची माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

इंटरनेट, मोबाईल मध्ये हरवून गेलेल्या तरुण पिढी मध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाच्या माध्यमातून मोफत वाचनालय उपक्रम राबवण्यात येत आहे. ह्यापूर्वी विविध उद्यानात १९ मोफत वाचनालये सुरू करण्यात आली असून, उद्यानातील ‘खुले वाचनालय’ या उपक्रमाअंतर्गत आर उत्तर विभागातील आनंदवन उद्यान, आनंदनगर, दहिसर पूर्व येथे मिशन ग्रीन मुंबई यांच्या सहकार्याने हे २०वे खुले वाचनालय सुरू करण्यात आले.

मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानातील खुले वाचनालयाच्या उपक्रमाला मुंबईकरांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी मुंबई पालिकेमार्फत विविध उद्यानात १९ खुले वाचनालय सुरू करण्यात आलेली आहेत.

मुंबई प्रोजेक्ट, गोदरेज, मेघाश्रय अशा अनेक सामाजिक संघटनाचे सहकार्य लाभलेले आहे. विसावे खुले वाचनालय सुरू करण्याक- रिता मिशन ग्रीन मुंबईचे सुबरजीत मुखर्जी यांनी विशेष प्रयत्न केले. या वाचनालयात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटाला आवडतील अशा प्रकारची पुस्तके ठेवण्यात आलेली आहेत. तसेच उद्यानात फिरायला येणारे नागरिक आपल्या आवडीची पुस्तके देखील इथे येऊन वाचू शकतात. शालेय विद्यार्थी देखील या वाचनालयात येऊन आपला शालेय अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात.

Related posts

साखर कंपन्याच्या शेअर्समधील गुंतवणुकीबाबत…

Videos : श्री अंबाबाईची विविध रुपातील पुजा

साहित्याचा केंद्रबिंदू शहराकडून गावाकडे सरकतोय : विजय चोरमारे

Leave a Comment