आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
प्रश्न – ह्या पावसाची शक्यता कधी व कोठे?
माणिकराव खुळे – संपूर्ण महाराष्ट्रात, परवा २६ ऑगस्ट मंगळवार ते शुक्रवार २९ ऑगस्टच्या चार दिवसा दरम्यान, मान्सून काहीसा सक्रिय होवून, मध्यम पावसाची शक्यता जाणवते. हा संथगतीने पडणारा आणि दुसऱ्या व शेवटच्या स्पेल चा ‘मघा’ नक्षत्रातील पाऊस आहे.
विशेषतः हा पाऊस रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खान्देश, छ.सं.नगर, जालना, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली सह संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यात, तसेच सह्याद्रीच्या नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पडण्याची शक्यता अधिक जाणवते. त्यामुळे कोकण व घाटमाथ्यावरील पावसाचे सातत्य पाहता, सह्याद्री कुशीतील नाशिक, पुणे, अ. नगर, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील धरणांतून नद्या व कॅनॉल पात्रात अगोदरच ओव्हरफ्लो होत असलेला पुर-पाणी विसर्ग असाच टिकून राहू शकतो, असे वाटते.
प्रश्न -कोणत्या वातावरणीय प्रणाल्यातून ह्या पावसाची शक्यता जाणवते ? 👇
माणिकराव खुळे – i)बं. उपसागरात, सोमवार दि.२५ ऑगस्ट दरम्यान होणारा एम.जे.ओ. चा प्रवेश
ii)ईशान्य मध्य प्रदेशावर समुद्रसपाटीपासुन ७.६ किमी उंचीपर्यन्त तयार होणारे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र आणि वायव्य दिशेकडे होणारे त्याच्या मार्गक्रमणाची शक्यता
iii) देश मध्यावरचा दक्षिणेकडे सरकण्याची शक्यतेचा हवेच्या कमी दाबाचा पूर्व-पश्चिम मान्सूनचा आस
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.