November 14, 2024
Goa Film Festival IFFI comming soon
Home » गोव्यातील चित्रपट महोत्सवासाठी सज्ज व्हा …!
मनोरंजन

गोव्यातील चित्रपट महोत्सवासाठी सज्ज व्हा …!

इफ्फी चे आयोजन भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) आणि गोवा सरकारची एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा आणि यजमान राज्य यांच्या सहकार्याने दरवर्षी केले जाते. 55 व्या इफ्फी च्या अद्ययावत माहितीसाठी www.iffigoa.org या महोत्सवाच्या संकेतस्थळाला भेट द्या.

#IFFIwood – नोव्हेंबर महिना उत्सवाची भावना घेऊन येत असल्यामुळे आम्ही तुम्हाला चित्रपटांच्या वार्षिक महोत्सवाचा-भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी ) भाग बनण्यासाठी आमंत्रित करतो, जो  पणजी, गोवा येथे 20 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत होणार आहे. गोवा राज्यातील अरबी समुद्राच्या नेत्रदीपक  पार्श्वभूमीवर सिनेमाचा आनंद साजरा करण्यासाठी जगभरातील चित्रपट प्रेमी येथे एकत्र येतात.

तुम्ही जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातील आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीतले असाल, मात्र इफ्फी तुम्हाला चित्रपटांबद्दलच्या प्रेमासाठी एकत्र येण्याची संधी  देते. हे बंध साजरे करण्यासाठी, आम्ही सर्वांना कथाकथनाचा आनंद आणि मोठ्या स्क्रीनची जादू अनुभवण्यासाठी आमंत्रित करत आहोत.  तुम्ही https://my.iffigoa.org/ वर नोंदणी करू शकता आणि या वर्षीच्या महोत्सवासाठी इफ्फी  प्रतिनिधी बनू शकता.

इफ्फीला उपस्थित का रहावे ?

55 व्या इफ्फी मध्ये, तुम्हाला 16 क्युरेटेड सेगमेंटमध्ये जगभरातील चित्रपटांची वैविध्यपूर्ण श्रेणी पहायला मिळेल. तुम्हाला  हृदयस्पर्शी नाट्य , थरारक माहितीपट किंवा नाविन्यपूर्ण लघुपट आवडत असतील तर या महोत्सवात प्रत्येक चित्रपट रसिकांना आनंद देणारे काही ना  काही  आहे.

प्रतिनिधींना इतर कोणाच्याही आधी अनेक चित्रपट पाहण्याची खास  संधी असणार आहे कारण अनेक चित्रपटांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रीमियर येथेच इफ्फीमध्ये होणार आहेत. मात्र  केवळ चित्रपट पाहण्यापुरते हे मर्यादित नाही ; तर कथा सांगण्याची कला देखील इथे शिकता येईल !

इफ्फीमध्ये दिग्गज चित्रपट निर्माते आणि उद्योग व्यावसायिकांच्या नेतृत्वाखाली  कार्यशाळा आणि मास्टर क्लासेस सादर केले जातात , जे त्यांचे विचार  आणि अनुभव सामायिक करण्यास उत्सुक असतात. प्रत्यक्ष  चर्चेत सहभागी व्हा , तुमच्या कल्पना मांडा  आणि सीमांच्या पलीकडे जाऊन मैत्री  करा आणि जर  तुम्ही उत्कट आणि नवोदित चित्रपट निर्माते असाल तर तुमचा पुढचा मोठा प्रकल्प साकार होऊ शकेल.

तुम्हाला चित्रपट उद्योगातील भपका  आणि प्रसिद्धी प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी देखील मिळेल.इफ्फी  रेड कार्पेटमध्ये प्रख्यात चित्रपट निर्माते, अभिनेते आणि मान्यवरांचा  समावेश आहे जे त्यांचे काम सर्वांसमोर आणण्यासाठी आणि सिनेमाबद्दलचे त्यांचे प्रेम सामायिक  करण्यासाठी एकत्र जमतात. इफ्फी प्रतिनिधींना चित्रपट निर्माते, अभिनेते आणि या उद्योगातील तज्ञांना भेटायची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी देखील मिळेल. कल्पना करा, तुमच्या आवडत्या चित्रपटांना पडद्यावर साकार करणाऱ्या लोकांसोबत प्रत्यक्ष  चर्चा आणि कल्पनांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळणार आहे.

याव्यतिरिक्त , इफ्फी  पुन्हा एकदा ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’, ‘फिल्म बझार ’ आणि ‘सिने मेला’  2024 ची आवृत्ती घेऊन येत आहे जे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला नवोदित प्रतिभावंतांसाठी आणि एकूणच चित्रपटांशी संबंधितांसाठी ‘वन स्टॉप शॉप’ बनवते. चला तर, आयुष्यभराच्या अनुभूतीसाठी सज्ज व्हा. या अनोख्या सिनेसृष्टीच्या प्रवासाचा भाग बनण्याची तुमची संधी हुकवू नका.

इफ्फी मध्ये प्रवेशयोग्यता

सर्वसमावेशकतेच्या प्रयत्नात, महोत्सव स्थळाची संरचना ही विनाव्यत्यय अनुभूतीची खबरदारी घेत विविध सुविधांसह प्रवेश करण्याजोगी केली आहे. दिव्यांगजनांच्या विशेष गरजांसाठी याठिकाणच्या पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. चित्रपटांचा आनंद घेण्यापासून कोणी वंचित राहू नये यासाठी  ईएसजीचा परिसर आणि चित्रपट प्रदर्शित होणाऱ्या इतर ठिकाणांना रॅम्प, रेलिंग, दिव्यांगजनांसाठी अनुकूल टँटाइल वॉकवे, पार्किंग स्पेस, रेट्रोफिटेड टॉयलेट, ब्रेलमधील साइनबोर्ड इत्यादी तरतुदींसह कोणतीही कसर न ठेवता सुसज्ज करण्यात आले आहे.

नोंदणी कशी करावी ?

नोंदणीसाठी, https://my.iffigoa.org/ वर लॉग इन करा.

55 व्या इफ्फी साठी प्रतिनिधी नोंदणी ही महोत्सवाच्या सांगतेपर्यंत सुरू राहील. यासाठीच्या श्रेणी खालीलप्रमाणे आहेत:

चित्रपट व्यावसायिक

  • नोंदणी शुल्क: 1180 रुपये (18% जीएसटी सह)
  • फायदे: ऑनलाइन मान्यता, अतिरिक्त तिकीट आणि पॅनेल आणि स्क्रीनिंगमध्ये विनामूल्य प्रवेश.

सिने रसिक

  • नोंदणी शुल्क: 1180 रुपये (18% जीएसटी सह)
  • फायदे: ऑनलाइन मान्यता आणि पॅनेल आणि स्क्रीनिंगमध्ये विनामूल्य प्रवेश.

प्रतिनिधी – विद्यार्थी

  • नोंदणी शुल्क: नाही
  • फायदे: ऑनलाइन मान्यता, पॅनेल आणि स्क्रीनिंगमध्ये विनामूल्य प्रवेश, दररोज 4 तिकिटांच्या परवानगीसह.

ही वर्गवारी व्यावसायिक, सिनेरसिक आणि सिनेसृष्टीच्या विद्यार्थ्यांसाठी आखलेले वेगवेगळे फायदे देते. विद्यार्थ्यांना चित्रपट आणि कार्यक्रमांच्या विस्तृत प्रदर्शनासह दररोज 4 तिकिटांसह विशेष प्रवेश मिळतो, चित्रपट व्यावसायिकांना दररोज एक अतिरिक्त तिकिट मिळते.

महोत्सवादरम्यान सर्व कार्यक्रम आणि ठिकाणी सुव्यवस्थित प्रवेशाची खातरजमा करून प्रतिनिधींना ऑनलाइन मान्यता मिळते. तुमच्या वैयक्तिकृत डॅशबोर्डमध्ये प्रवेश करण्यासाठी तुमचे My-IFFI खाते https://my.iffigoa.org/ तयार करा, जिथे तुम्ही तिकिटे बुक करू शकता आणि उत्सवाचे वेळापत्रक तपासू शकता. तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, registration@iffigoa.org वर संपर्क साधा. आता नोंदणी करा आणि सिनेकलेचा उत्सव एकत्र साजरा करूया.

तुम्ही गोव्याची तिकिटे बुक करून चित्रपट महोत्सवासाठी आमच्यासोबत सामील होताना तुमची उत्कंठा  शिगेला पोहोचली असेल!

इफ्फी बद्दल

1952 मध्ये स्थापन झालेला, भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा आशियातील प्रमुख चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. आकर्षक कथानक आणि त्यामागील सर्जनशील व्यक्तींद्वारे चित्रपट प्रदर्शनाचे इफ्फी चे स्थापनेपासूनच उद्दिष्ट आहे. या महोत्सवात चित्रपटांना दाद आणि स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी, लोकांमध्ये समंजसपणाचे आणि सौहार्दाचे पूल बांधून वैयक्तिक आणि सामूहिक उत्कृष्टतेच्या नवीन उंचीवर पोहोचण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला जातो.

इफ्फी चे आयोजन भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) आणि गोवा सरकारची एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा आणि यजमान राज्य यांच्या सहकार्याने दरवर्षी केले जाते.

55 व्या इफ्फी च्या अद्ययावत माहितीसाठी www.iffigoa.org या महोत्सवाच्या संकेतस्थळाला भेट द्या.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading