कोल्हापूर – येथील त्रैमासिक वारूळ यांच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2023 चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी महाराष्ट्रातून कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, आत्मकथन, नाटक आणि सपांदन/समीक्षा या साहित्य प्रकारातील १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेली पुस्तके मागविण्यात आली होती. या साहित्य स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्याचे आयोजक डॉ. सतेज दणाणे यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी मराठीमधील २१९ पुस्तके प्राप्त झाली होती. यातून उत्कृष्ट पुस्तकांची निवड करणे हे एक मोठे आव्हान होते असेही श्री दणाणे यांनी सांगितले.
पुरस्कारप्राप्त साहित्यिक असे…
कवितासंग्रह
असहमतीचे रंग- अशोक नामदेव पळवेकर ( अमरावती )
स्वेदरंग – बळवंत भोयर ( नागपूर )
झांजडझगडा – विक्रम राजवर्धन ( गगनबावडा, कोल्हापूर ) कथासंग्रह
हेळसांड – अनंता सूर ( वणी, जि.- यवतमाळ )
वसप – महादेव माने ( खंडोबाची वाडी, जि.सांगली )
कादंबरी
सुलवान – मेघा पाटील ( आटपाडी, जि. सांगली )
आत्मकथन
निवडुंगाचे काटे – जी. जी. कांबळे ( लातूर )
नाटक
क्रांतिवीर बाबुराव शेडमाके – चुडाराम बल्लारपुरे ( गडचिरोली )
संपादन/समीक्षा
संजय चौधरीच्या कवितेचा कोलाज – डॉ. रमेश माने ( अमळनेर )
अशोक शिरसाट : व्यक्ती आणि वाङ्मय – डॉ. श्रीकांत पाटील ( घुणकी, जि – कोल्हापूर )
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.