March 29, 2023
sunetra-joshi-poem-on-sant-tukaram
Home » संत तुकाराम…
कविता

संत तुकाराम…

संत तुकाराम... 

कनकाई पोटी | माघ पंचमीला ||
तुकोबा जन्मला | देहू गावी ||

भार्या आवडाई | बोल्होबा ते तात ||
चार मुले त्यात | तुकोबांना ||

रंजले गांजले | आणि मागासले ||
प्रबोधन केले | समाजाला ||

नामात विठ्ठल | ध्यानात विठ्ठल ||
श्वासात विठ्ठल | तुकोबांच्या ||

रोखठोकपणे | दांभिकपणाला ||
केले समाजाला | निरुत्तर ||

गोविंद गोविंद | लागलासे छंद ||
नाही भेदाभेद | दोघांच्यात ||

सदेह वैकुंठी | विठ्ठल सदनी ||
पुष्पक विमान | बैसोनिया ||

तुकाराम बीज |त्यांची पुण्यतिथी ||
द्वितीया ही तिथी | फाल्गुनाची ||

जगद्गुरू त्यांना | उपाधि मिळाली ||
समाजाने  दिली | सन्मानाने ||

तुकारामगाथा | ज्ञानभक्तीपर ||
तरे पाण्यावर | चमत्कार. ||

विठ्ठल चरणी | सुनेत्रा ही लीन ||
करते वंदन | तुकारामा ||

सौ सुनेत्रा विजय जोशी 
रत्नागिरी

Related posts

पापणी…

बोर्डाची परीक्षा

तुकोबांशी जोडून घेताना…

Leave a Comment