December 7, 2023
Asutosh Rana comment on Hindi Divas
Home » भाषेचा सन्मान केलात तर ती तुम्हाला प्रतिष्ठा देईल: आशुतोष राणा
काय चाललयं अवतीभवती

भाषेचा सन्मान केलात तर ती तुम्हाला प्रतिष्ठा देईल: आशुतोष राणा

भाषेचा सन्मान केलात तर ती तुम्हाला प्रतिष्ठा देईल: तिसऱ्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेत प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि लेखक आशुतोष राणा यांचे प्रतिपादन

तिसऱ्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ कवी, गीतकार आणि टीव्ही पत्रकार आलोक श्रीवास्तव यांनी त्यांची मुलाखत घेतली. आशुतोष राणा सुरुवातीला म्हणाले की, हिंदी ही माझ्या स्वप्नांची भाषा आहे, माझ्या प्रियजनांची भाषा आहे, माझ्या रोजगाराची भाषा आहे, त्यामुळे ती समृद्ध झालीच पाहिजे. हा आपल्या व्यवसायाचा आणि वर्तनस्वभावाचाही विषय आहे. माझ्या आईला अनेक भाषा अवगत होत्या. आम्ही लहान असताना ती म्हणत असे की तुम्ही भाषेचा सन्मान राखलात तर ती तुमचा मान राखेल. मी एक अभिनेता म्हणून तुम्हाला आवडेन किंवा आवडणार नाही, पण एक भाषाप्रेमी असल्याने तुम्हाला मी नक्कीच आवडेल. भाषा आपल्यातील भावना जागृत करते. लिहिण्या बोलण्यात वापर करून हिंदी भाषेचा आम्ही सन्मान केला असे अनेकजण म्हणतात, पण मी म्हणेन  हिंदीने मला सन्मान दिला आहे. आशुतोष राणाची ओळख तुमच्यामध्ये अभिनेता म्हणून असेल पण मला वाटते की माझी ओळख एक लेखक आहे.

हिंदी पंधरवडा साजरा करणे ही आपली उत्सवधर्मिता

लोक मला विचारतात की हिंदी पंधरवडा का साजरा केला जातो, फक्त 15 दिवसच हिंदीची सेवा का? तेव्हा त्यांना माझे सरळ उत्तर आहे की हा विनोदाचा विषय नाही. ही आपली उत्सव साजरा करण्याची भावना आहे. आपण वर्षातून एकदा आपला वाढदिवस साजरा करतो याचा अर्थ आपण 364 दिवस मृतप्राय आहोत असा होत नाही. हिंदी दिवस आणि हिंदी पंधरवडा साजरा करण्यामागील कारण म्हणजे या दिवशी आणि या पंधरवड्यात आपण हिंदीच्या सेवेचा उत्सव साजरा करतो. आपल्या देशात केवळ सणच साजरे होत नाहीत, भावनाही साजऱ्या होतात, भाषाही साजऱ्या होतात. भारतीयांच्या स्वभावाचा मूळ कल उत्सवाकडे आहे, असे सांगत आशुतोष राणा यांनी अनेक रंजक प्रसंग कथन केले आणि कविताही सादर केल्या.

तरुणाईचा संबंध वयाशी नसून अवस्थेशी

तारुण्याचा संबंध वयाशी नसून अवस्थेशी आहे, असे आशुतोष राणा म्हणाले. जोपर्यंत तुमच्या वडिलांच्या पायात स्वत:च्या हाताने जोडे घालण्याची क्षमता आहे किंवा जोपर्यंत तुम्ही तुमच्या आईचा किंवा मुलीचा हात धरून चालू शकता तोपर्यंत तुम्ही तरुण आहात. त्यामुळे तरुणाईचा संबंध वयाशी नसून अवस्थेशी आहे, असे माझे मत आहे.

तिसऱ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात महाराष्ट्र हिंदी परिषदेच्या उपाध्यक्षा प्रियांका शक्ती ठाकूर यांनी ‘सर्व सुलभ, सर्वसमावेशक आणि सर्वव्यापी भाषा-हिंदी’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. हिंदी खूप महत्त्वाची आहे, त्यात भरपूर गोडवा आहे, पण वेळोवेळी तिचा गोडवा कमी होत असतो. याला आपणच कारणीभूत आहोत, असे त्या म्हणाल्या. मोठ्या कार्यक्रमात गेल्यावर आपल्याला वाटते की इथे हिंदी बोललो तर आपले महत्त्व कमी होईल, पण हे बरोबर नाही. तिथे आपण इंग्रजीत बोलतो. आपल्या स्टॅंडर्डचा आपण विचार करतो, हे चुकीचे आहे असे मला वाटते. त्यासाठी आपली विचारसरणी बदलायला हवी. आपण कोणत्याही सभेला, कार्यक्रमाला किंवा परिषदेला कुठेही गेलो तरी हिंदीतूनच बोलायचे, असे ठरवले, तर हिंदी सर्वव्यापी व्हायला वेळ लागणार नाही आणि हिंदीचे स्वरूपच बदलून जाईल. आपल्या गृहमंत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी एक अध्यादेश जारी केला होता, त्यानुसार डॉक्टरांनी आपले प्रिस्क्रिप्शन हिंदीत द्यायचे आहेत. यामुळे अधिकाधिक लोकांना योग्य माहिती मिळेल आणि आम्ही सर्वांसाठी हिंदी सुलभ करू शकू.

हिंदीत राजभाषा होण्यासाठी सर्व गुण

आपल्या राज्यघटनेने 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला राजभाषेचा दर्जा दिला. आपल्याला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही, त्याचप्रमाणे हिंदीलाही राजभाषेचा दर्जा सहजासहजी मिळाला नाही.  इंग्रजीसह आणि तमिळ, तेलगू, कन्नड, पंजाबी, बंगाली  यांसारख्या इतर भारतीय भाषांचे हिंदीला आव्हान होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही राजभाषा होती, मुघलांच्या काळातही फारसीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला होता. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि राज्यघटना लागू झाल्यानंतर राजभाषेसाठी त्रिभाषा सूत्र स्वीकारण्यात आले.   ज्यामध्ये हिंदी, इंग्रजी आणि कोणत्याही राज्यातील प्रादेशिक भाषेत काम करण्याची परवानगी मान्य करण्यात आली.  इंग्रजीच्या अवघडपणामुळे आणि वैज्ञानिकतेमुळे, 19व्या आणि 20व्या शतकातही सर्वसामान्य लोकांमध्ये त्याची भीती होती. त्यामुळे ही भाषा गरीब आणि ग्रामीण लोकांसाठी अप्राप्यच राहिली. यासोबतच केवळ एका विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित असणे ही प्रादेशिक भाषेची कमतरता राहिली. परिणामी हिंदीत राजभाषेचा दर्जा मिळवून देणारे सर्व गुण आहेत.

महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकांनीही हिंदीचा अवलंब केला

आपल्या हिंदी भाषेचे तीन गुण आहेत. प्रथम, हिंदी भाषा सर्व सुलभ आहे, हिंदी भाषा सर्वसमावेशक आहे आणि हिंदी भाषा सार्वत्रिक आहे. हिंदी सर्वसामान्यांना सहज उपलब्ध आहे. त्यामुळे महात्मा गांधी गुजराती आणि लोकमान्य टिळक मराठी असूनही त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत जनजागृतीसाठी हिंदी भाषेचा वापर केला. कारण त्यांना माहीत होते की, हिंदी भाषा सर्वांना उपलब्ध आहे आणि तिचा सर्वसामान्यांवर अधिक प्रभाव पडेल, असे मत प्रियांका शक्ती ठाकूर यांनी मांडले.

Related posts

खासगी शिकवण्या – एक शैक्षणिक धंदा

सायकल वापरा चळवळ…

डॉ. यशवंतराव थोरात यांचे लेखन व्यापक मूल्यशिक्षणाचा वस्तुपाठ

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More