अबोल असलेलंच बरं असतं
देठ जपलेलंच बरं असतं
मौनातल्या कळ्यांना
थेट भेटलेलंच बरं असतं…
चुकला जरी जरासा
रस्ता अशांतसा तो
समजून शब्द आपले
थोपवलेलं बरं असतं
मौनातल्या कळ्यांना
थेट भेटलेलंच बरं असतं..
कोणी काही बोले
समजे कधी चुकीचे
आपलाच ऐना अलबत
मानणंच खरं असतं
मौनातल्या कळ्यांना
थेट भेटलेलंच बरं असतं…
अबोल असलेलंच बरं असतं
देठ जपलेलंच बरं असतं
अस्तिव तोडताना
ऋण फिटलेलंच बरं असतं..