October 5, 2024
Monsoon reach Kerala Manikrao Khule article
Home » Privacy Policy » मान्सून केरळात आदळला
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मान्सून केरळात आदळला

‘ मान्सून केरळात आदळला ‘

मान्सून आज गुरुवारी ( दि. ३० मे २०२४ ) केरळ राज्याच्या दक्षिण टोकावर पोहोचून तेथे तो सक्रिय झाला आहे.  ह्यावर्षीची त्याची आगमन भाकित तारीख ३१ मे २०२४ च्या अगोदर एक दिवस तर दरवर्षी असणारी त्याची सरासरी १ जून तारखेच्या अगोदर दोन दिवस तो देशाच्या भू- भागावर प्रवेशित झाला आहे.

मान्सून केरळ राज्याबरोबरच देशाच्या पूर्वोत्तर भागातील ७ राज्यातही त्याने प्रवेश केला आहे.
मान्सून केरळ राज्याच्या टोकावरील सक्रियतेंनंतर उर्वरित केरळाचा बराचसा भाग, कन्याकुमारी, दक्षिण तामिळनाडू, मालदीव व लक्षद्विप भागापर्यंत त्याने आज मजल मारली आहे.

वादळी वाऱ्यासह वळीव पावसाची शक्यता

मान्सूनचे केरळातील आगमनानंतर मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील खान्देश, विदर्भ, मराठवाड्यासहित उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात, शनिवारी ( दि. १ जून) ते सोमवारी ( ३ जून ) जूनपर्यन्त वादळी वाऱ्यासह वळीव पावसाची शक्यता जाणवते. तर तो पर्यंतच्या पुढील २ दिवसात मात्र उष्णतेत अजुन वाढ होण्याची शक्यता जाणवते.
              मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात मात्र आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे एक जूनपर्यन्त, सध्या चालु असलेल्या ढगाळयुक्त दमटयुक्त उष्णतेचे वातावरण कायम असेल.

उष्णता सदृश्य लाट –

            आज व उद्या गुरुवार- शुक्रवारी (३०-३१ मे रोजी) खान्देश व मराठवाड्यातील ११ जिल्ह्यात उष्णता सदृश्य लाट टिकून असेल. तर खान्देशात रात्रीचाही उकाडाही ह्या दोन दोन दिवसात जाणवेल.

माणिकराव खुळे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading