January 26, 2025
Bright future for agriculture and rural tourism
Home » कृषी व ग्रामीण पर्यटनाला उज्ज्वल भविष्य
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषी व ग्रामीण पर्यटनाला उज्ज्वल भविष्य

शासनाकडे नोंदणीकृत असे १ हजारच्या आसपास कृषी पर्यटन केंद्र आहेत. सर्वात जास्त कृषी पर्यटन केंद्र पुणे विभागात आहेत. कृषी पर्यटन केंद्र प्रत्येक प्रमुख गावात २ आणि तालुक्यात किमान १० केंद्र होणे गरजेचे आहे. ते लवकरच होणार आहेत.

गणेश चप्पलवार
मोबाईल – 8888559886, ई मेल – chappalwarg@gmail.com

आदिम काळापासून ते आतापर्यंत लोकांना विशेषता शहरी लोकांना गाव, गावातील संस्कृती, शेती आणि मातीचा (मड महोत्सव) आनंद घेण्यासाठी नेहमी उत्सुकता असते. आजही या शेती आणि मातीत आनंद घेण्यासाठी आणि शांत जीवनशैली अनुभवण्यासाठीत ग्रामीण भागांना भेटी देत असल्याची नोंद इतिहास आहे.

या भेटी दरम्यान शेती, खाद्य संस्कृती, पाहुणाचार, आपलेपणा, शेतीतील व गावातील सणं- समारंभ, जत्रा, यात्रा, विविध खेळाचा अनुभव घेण्यासाठी आजही शहरातील लोक मामाच्या, काकांच्या अथवा ओळखी असलेल्या शेतक-यांकडे अगदी हक्काने जातात. पण ज्यांना मामाच्या किंवा इतरांच्या शेतात काही कारणांसाठी जाता येत नाही अशासाठी हक्काच ठिकाण म्हणजे कृषी पर्यटन केंद्र होय.

कृषी पर्यटन म्हणजे काय तर पर्यटकांना गाव आणि शेती संस्कृती विषयक माहिती देऊन त्यांचे सर्वांगाने अनुभव समृद्ध करणे म्हणजे कृषी पर्यटन होय.

कृषी पर्यटन म्हणजे आपल्या शेतात शहरी पर्यटकांना बोलवून शेती आणि गावाची संस्कृती प्रत्यक्षात दाखवणे. शिवार फेरीच्या माध्यमातून शेती कशी पिकवली जाते. कशी केली जाते. विविध पिके, फळांची आणि पशूधनांविषयी माहिती शेती अण् गावापासू दूर गेलेल्या लोकांना सांगणे. सकाळी, दुपारी आणि रात्री अणुक्रमे न्याहरी, जेवण आणि रात्रीचे अस्सल गावराण खाद्य संस्कृतीसह रात्री मुक्कामी पर्यटकाला कृषी पर्यटन केंद्रात स्थानिक व पारंपरिक खेळांची लोक केलेचा अनुभूती देणे.

गावातील १२ बल्लुतेदारी व १८ अलुतेदारी पध्दती सांगणे पाहुचाराचे परोमोच्च आनंद देणे म्हणजे कृषी पर्यटन होय. कृषी पर्यटन हे कृषीरंजन व कृषीशिक्षणावर भर देणार प्रकल्प आहे.

जागतिक कृषी पर्यटनाचा विचार केला तर १९ व्या शतकात अमेरिका आणि युरोपता लोकं निवांत व शांततेसाठी आपले मूळ म्हणजे गावाकडे गेल्याची ऐतिहासिक नोंद आहे. कृषी पर्यटनाचा जागतिक व्यावसायिकीकरणाला आँस्टेलिया या देशातून सुरू झाले आहे. भारतात ९० च्या दशकात जागतिकिरणानंतर कृषी व ग्रामीण पर्यटनाला सुरू झाले. कृषी पर्यटनाचा विचार अधिकाधिक व्यावसायिक स्वरूपात विकसित २००० च्या आसपास एका शेतकरी चळवळीत झाले. २०१० पर्यंत कृषी पर्यटनाचे महत्व व गरज महाराष्ट्रातील प्रगत शेतक-यांना व कृषी व्यावसायिकांना आणि उद्योजकांना लक्षात आहे. त्यानंतर अनेक शेतक-यांनी कृषी पर्यटनांचा प्रयोग करून पैसा आणि प्रतिष्ठा मिळवू लागले. असे अनेक शेतक-यांना लक्षात आल्यानंतर इतर शेतकरी आणि शेती व्यावसाय करणा-यांनी कृषी पर्यटनाकडे आशेने पाहू लागले. २०२० नंतर सरकार मान्य असे महाराष्ट्र शासनाने कृषी पर्यटन धोरण २०२० आले. महाराष्ट्र हे देशातील पहिले कृषी पर्यटन धोरण आणणारे राज्य आहे.

शासनाकडे नोंदणीकृत असे १ हजारच्या आसपास कृषी पर्यटन केंद्र आहेत. सर्वात जास्त कृषी पर्यटन केंद्र पुणे विभागात आहेत. कृषी पर्यटन केंद्र प्रत्येक प्रमुख गावात २ आणि तालुक्यात किमान १० केंद्र होणे गरजेचे आहे. ते लवकरच होणार आहेत. भविष्यात शेतात शेती विषयी नवनविन प्रयोग करणारे शतकरी, शेती व्यवयाय करणारे, शेतकरी गट, कंपन्या, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ, सेंद्रीय शेती, दुग्ध व्यवसाय करणारे आणि इतर शेती पूरक व्यवसाय करणारे शेतकरी सुदधा कृषी पर्यटन करू शकतो.

शेतकरी कृषी पर्यटनाकडे सकारात्मकतेने विचार करत आहेत. भविष्यात लोक शहराला कंटाळून किमान २ दिवस तरी गावाकडे म्हणजेच कृषी पर्यटनाकडे वळणार आहेत. लग्न, साखरपूडा, वाढदिवस आणि कंपन्याचे कार्यक्रम, शाळा, महाविद्यालय, सोसायटीचे ग्रुपचे सहली आणि इतर उपक्रम व कार्यक्रम निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे कृषी पर्यटनात होणार आहेत. कृषी व ग्रामीण पर्यटनाला उज्ज्वल असे भविष्य आहे. हे आताच्या एक हजार नोदणीकृत व असंख्य अनोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्राकडे पाहून वाटते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading