- घाटकुळ येथे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन १२ व १३ नोव्हेंबर रोजी
- उद्घाटन पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार, संमेलनाध्यक्ष डॉ. नामदेव कोकोडे
राष्ट्रसंत साहित्य विचार परिषदेचे १८ वे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन आदर्श गाव घाटकुळ (ता. पोंभुर्णा जि. चंद्रपूर ) येथे श्रीगुरुदेव सेवा मंडळ आणि संपुर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित केले आहे. दोन दिवसीय संमेलन १२ व १३ नोव्हेंबर २०२२ रोजी होत असून या संमेलनाचे उद्घाटन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष राष्ट्रसंताच्या विचाराचे सच्चे पाईक प्राचार्य डॉ. नामदेव कोकोडे (ब्रम्हपुरी) हे असणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, स्वागताध्यक्ष विनोद देशमुख, माजी सभापती दीपक सातपुते, प्रचारक लिंगा रेड्डी (तेलंगण), सरपंच सुप्रीम गद्येकार , मुकेश टांगले, भाऊ बराटे, ॲड. किरण पाल, मुख्याध्यापक प्रफुल्ल निमसरकार उपस्थित राहणार आहे.
संमेलनाची सुरुवात सकाळी दहा वाजता राष्ट्रसंत साहित्य दिंडीने होणार आहे. यात शालेय विद्यार्थी, गाव परिसरातील भजन मंडळी सहभागी होणार आहे. उदघाटन समारंभानंतर’ ‘गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा ‘ या परिसंवादात डॉ. श्रावण बाणासुरे (बल्लारपूर), डॉ. मोहन कापगते (ब्रम्हपुरी), अरुण झगडकर, पंढरीनाथ चंदनखेडे (पुणे), ॲड. सारिका जेनेकर (राजुरा), श्रीकांत धोटे (गडचिरोली) विचार मांडतील. अध्यक्षस्थानी डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे राहणार आहे.
सायंकाळच्या सत्रात सामुदायिक प्रार्थनेवर जहीर खान विचार व्यक्त करणार आहे. तर पहिल्या प्रबोधनसंध्या भागात सुधाकर गेडेकर, अनुराग मुळे, मुरलीधर चुनारकर जनप्रबोधनपर एकपात्री प्रयोग सादर करणार आहे. रात्री ठीक ९ वाजता सुप्रसिद्ध युवा सप्तखंजेरीवादक उदयपाल महाराज वणीकर यांचा खंजेरी वादनाचा कार्यक्रम होणार आहे.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी श्रमदान, स्वच्छता अभियान त्यानंतर सामुदायिक ध्यान आणि निसर्गोपचार योग प्राणायाम मार्गदर्शन होणार आहे. ध्यानावर डॉ. नवलाजी मुळे (अड्याळ टेकडी) यांचे चिंतन प्रस्तुत होणार तर योग निसर्गोपचार संबंधित विनायक साळवे विचार व्यक्त करतील. सकाळच्या अनुभव कथन या परिसंवादात संजय तिळसमृतकर, केशव दशमुखे, किशोर इंगोले, हरिश्चंद्र बोढे, सौ. रोकडे, सुभाष पावडे, प्रशांत कडू, सौ.भागवत, खुशाल गोहोकर, सुरेश चौधरी, सेवकदास खुणे, विलास चौधरी, महेंद्र दोनोडे आदी प्रचारक-अभ्यासक मंडळी विचार व्यक्त करणार आहे.
सकाळी दहा वाजता प्राचार्य रत्नमाला भोयर यांच्या अध्यक्षतेत कवी संमेलन होईल. त्यात ज्येष्ठ कवी धनंजय साळवे, उद्धव नारनवरे , विनायक धानोरकर, लक्ष्मण खोब्रागडे, डॉ. जुनघरे, ॲड. जेणेकर, सुनील पोटे, महादेव हुलके, सतिश लोंढे, सौ. गावतुरे, सौ. भिवरा आत्राम , सुनिल बावणे, संतोष उईके, मनिषा पेंदोर, प्रकाश काळे, संगिता बांबोळे, सुधाकर कन्नाके, दिलीप पाटील,रजनी हासे, उपेंद्र रोहणकर, संतोष मेश्राम, वृंदा पगडपल्लीवार,आरती रोडे, भारती लखमापुरे, प्रिती जगझाप, रोहिणी मंगरूळकर आदी कवी आपल्या रचना प्रस्तुत करणार आहे.
दुपारी बारा वाजता संमेलनाचा समारोप पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, राजगडचे माजी सरपंच चंदू पा. मारकवार, ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे, वर्धा जि .प .चे माजी अध्यक्ष शशांक घोडमारे, सुनील नाथे, मधुसूदन दोनोडे , प्राचार्य भाऊराव पत्रे आदींच्या उपस्थितीत होणार आहे.
या संमेलनाचे आयोजन सर्व स्थानिक मंडळाच्या वतीने करण्यात येत असून विशिष्ट सेवा पुरस्कार व चैतन्य युवा पुरस्कार वितरण करण्यात येईल, जास्तीत जास्त लोकांनी संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वागताध्यक्ष सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते विनोदभाऊ देशमुख यांनी केले आहे.
संमेलनाचे आयोजनासाठी पोलिस पाटील अशोक पाल, उपसरपंच शितल विनोद पाल , ग्रा. पं. सदस्य विठ्ठल धदंरे, प्रकाश राऊत, जयपाल दुधे, रजनी हासे, रंजना राळेगावकर , कल्पना शिंदे, लता खोबरे, परिषदेचे सरचिटणीस ॲड. राजेंद्र जेनेकर, लक्ष्मण खोब्रागडे, प्रशांत भंडारे, ईंजी. विलास उगे, रामकृष्ण चनकापुरे, रत्नाकर चौधरी, नामदेव पिजदूरकर, राम चौधरी , मुकुंद हासे, अरुण मेदाडे, काजल राळेगावकर, किशोर ठाकरे, ज्ञानेश्वर चौधरी, स्वप्निल बुटले, संजय वैद्य, देवराव कोंडेकर, शंकर दरेकर, जनहित युवा संघटनेचे मुकूंदा हासे, मराठा युवक मंडळाचे विठ्ठल धदंरे, संपुर्ण ग्राम पंचायत सदस्यांनी उत्तम नियोजन केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.