सुपर फूड मटार
हिरवा वाटाणा ( Green Pea ) किंवा मटार
इंग्रजी नाव – ग्रीन पी
शास्त्रीय नाव – Pisum sativum
थंडीच्या दिवसात मटार बाजारात येतात..मटारचे हिरवेगार ढीग पाहून मन तृप्त होत. मटार एक सुपर फुड आहे. मटारचे जीवन चक्र एक वर्ष असते. ते जगातील अनेक भागांमध्ये पिकवले जाणारे थंड हंगामातील पीक आहेत; हिवाळ्यापासून उन्हाळ्याच्या सुरुवातीस स्थानानुसार लागवड केली जाऊ शकते. मटारचे सरासरी वजन ०.१ ते ०.३६ ग्रॅम (०.००४–०.०१३ औंस) दरम्यान असते. अपरिपक्व वाटाणे (आणि बर्फाच्या मटारमध्ये कोमल शेंगा देखील) भाजी, ताजे, गोठलेले किंवा कॅन केलेला म्हणून वापरतात; विशेषत: शेतातील मटार म्हटल्या जाणाऱ्या प्रजातींचे वाण पिकलेल्या शेंगामधून फुटलेल्या वाटाणासारखे कोरडे वाटाणे तयार करण्यासाठी घेतले जातात. हे मटार दलिया आणि वाटाणा सूपचा आधार आहेत.
हिरवा वाटाण्याचे हे आहेत फायदे –
- मटार मध्ये व्हिटॅमिन बी 6 भरपूर आहे. जे तुम्हाला एनर्जी देते. तुमच्या डोळ्यांचे रक्षण करते.
- मटार मध्ये विपुल प्रमाणात मॅग्नेशियम आहे जे तुमचे हृदय चांगले ठेवते.
- मटामध्ये खूप फायबर आहे.
- मटारमुळे आतड्यात चांगले बॅक्टेरिया तयार होतात. यातून पोटाच्या कॅन्सर पासून बचाव होतो.
- मटारचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेही रुग्ण मटार खाऊ शकतात.
- मटार प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे.
- मटार मध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट आहेत जे तुम्हाला विषारी द्रव्यांपासून मुक्त करतात.
मटार भरपूर खा आणि स्वस्थ रहा…
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक, ताराबाई पार्क, सासने ग्राउंड जवळ, कोल्हापूर
9623895866
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.