आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ ?
माणिकराव खुळे
प्रश्न – एखाद्या गाव, शहरात काही विशिष्ट भागातच पाऊस पडतो. कुठे ओले तर कुठे सुके असते. असे का होते. याची काय करणे असतील ?
उत्तर – एखाद्या गाव, शहरात काही विशिष्ट भागात पडणारा पाऊस म्हणजे, वातावरणातील संवहनी क्रियेद्वारे पडणारा पाऊस होय. येथे तेथील भौगोलिक रचना महत्वाची असते. येथे त्या भागावर पडणारी सूर्याची उष्णता हाच महत्वाचा फॅक्टर असतो. सूर्याच्या उष्णताऊर्जेने जमिनीचा पृष्ठभाग तापून जेंव्हा जमिनीने शोषलेले पाण्याचे बाष्पभवनातून, ऊबदार, अश्या दमट पाण्याच्या वाफेचे अवकाशात उर्ध्वगमन होवून, उंचावरील थंडाव्यातून, पाण्याच्या वाफेचे सांद्रीभवन होवून फक्त त्या मर्यादित क्षेत्रातच पडणारा पाऊस म्हणजे वातावरणातील संवहनी क्रियेद्वारे पडणारा पाऊस होय.
म्हणून तर हा पाऊस एखाद्या गाव, शहरात काही विशिष्ट भागात पाऊस पडतो. कुठे ओले तर कुठे सुके असते. समुद्रावरून अतिउंचावर संक्रमणित झालेले बाष्प त्यात मिसळले जाते, व त्याचाही आलेल्या बाष्पाशी संयोग होतो. म्हणून तर ह्या पावसाला स्थानिक वातावरणीय ऊर्जेबरोबर समुद्रीय ऊर्जेचा अप्रत्यक्ष संबंध असतो.
साधारण पूर्वमोसमी हंगामातील मार्च ते मे तसेच परतीच्या पाऊस फिरू लागल्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर (उत्तरा, हस्त, चित्रा नक्षत्र ) महिने, मान्सून आगमन व खंडा नंतरच्या काही दिवसातील पाऊस हा अश्या पद्धतीचा पाऊस असतो. ह्या प्रक्रियेतून झालेल्या पावसाचे उदाहरण द्यावयाचे झाले तर, मागील वर्षी म्हणजे ६ महिन्यापूर्वी १७ डिसेंबर २०२३ रोजी सागरीय किनारपट्टीवरील वातावरणीय परिणामातून एकाकी उर्ध्वदिशेने झालेल्या उष्णसंवहनी प्रक्रियेतुन तामिळनाडूतील ‘थुथूकुडी ‘ येथे २४ तासात झालेला ९५ सेमी. पाऊस हे त्याचे उदाहरण होय.
माणिकराव खुळे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.