राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
चंद्रपूर जिल्ह्यातील शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्थेतर्फे यावर्षी राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. मागील तेरा वर्षापासून हे पुरस्कार देण्यात येत असून पुरस्काराचे हे चौदावे वर्ष आहे.
या वर्षीच्या पुरस्कारासाठी जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील कथासंग्रह, काव्यसंग्रह, कादंबरी, समीक्षा किंवा संपादन, नाटक आणि आत्मकथन या साहित्य प्रकारातील प्रस्ताव मागविण्यात आले आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या २प्रती, अल्पपरिचय आणि पासपोर्ट फोटोसह प्रस्ताव केवळ पोस्टानेच (कुरीयरने पाठवू नये) ३० एप्रिल २०२४ पर्यंत पाठवावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनंता सूर यांनी केलेले आहे.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता – डॉ.अनंता सूर , कल्पना मार्बलमागे, छोरीया ले आऊट, गणेशपूर( वणी ), ता-वणी, जि – यवतमाळ. पिन ४४५३०४ मोबाईल – ९४२१७७५४८८
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.