कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशक यांच्याकडून पुस्तके मागविण्यात आली आहेत. १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत प्रसिद्ध झालेली पुस्तके येत्या ३० मे २०२२ पर्यत पाठवावीत असे आवाहन दमसाच्यावतीने करण्यात आले आहे.
यंदाच्यावर्षी कादंबरी, कथा, ललित, कथासंग्रह, वैचारिक, संशोधन, कवितासंग्रह या प्रकारातील साहित्यकृतींना गौरवण्यात येणार आहे. तसेच प्रथम प्रकाशित पुस्तकाचाही पुरस्कारामध्ये समावेश आहे, अशी माहिती दमसाच्यावतीने देण्यात आली आहे.
दमसाच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यासह बेळगाव परिसरातील लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात. ते असे देवदत्त पाटील पुरस्कार (कादंबरी), अण्णा भाऊ साठे पुरस्कार (कथा, ललित), शंकर खंडू पाटील पुरस्कार (कथासंग्रह), कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार ( वैचारिक, संशोधन ), शैला सायनाकर पुरस्कार ( कवितासंग्रह), चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन) याबरोबरच बालवाडःमय पुरस्कार आणि विशेष पुरस्कारही देण्यात येतो.
इच्छुक लेखक, प्रकाशक यांनी पुस्तकाच्या दोन प्रती ,फोटो आणि परिचय अर्जासोबत ३० मे २०२२पर्यंत कार्यवाह, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, जी – ६, स्मृती आपर्टंमेंट, बाबूजमाल रोड, सरस्वती टाँकीजवळ, कोल्हापूर ४१६०१२ या पत्यावर पाठवावे, असे आवाहन सभेच्या वतीने करण्यात आले आहे.