July 17, 2025
Conservation of crocodiles is necessary for the balance of the environment Dr. Manoj Borkar
Home » पर्यावरणाच्या समतोलासाठी मगरींचे संवर्धन गरजेचे: डॉ. मनोज बोरकर
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

पर्यावरणाच्या समतोलासाठी मगरींचे संवर्धन गरजेचे: डॉ. मनोज बोरकर

पर्यावरणाच्या समतोलासाठी मगरींचे संवर्धन गरजेचे: डॉ. मनोज बोरकर

सर्वच मगरी धोकादायक नसतात, त्यांचे अस्तित्व महत्वाचे

कोल्हापूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मगरींचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. मनोज बोरकर (Professor and Head, Department of Zoology; Carmel College for Women, Goa) यांनी ‘Crocks on the Rocks’ या विषयावर शुक्रवारी (दि. २५) बोलताना केले.

शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागात आयोजित शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आप्पासाहेब तानसेन वरुटे स्मृती व्याख्यानमालेत १६ वे पुष्प गुंफताना ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार होत्या.

भारतात आढळणाऱ्या मगरींच्या विविध प्रजाती , त्यांचे अधिवास, त्यांची वर्तणूक, या बद्दल सविस्तर माहिती दिली. माणसावर मगरी नेहमी हल्ला करत नाहीत, माणसावर हल्ला करणाऱ्या मगरींच्या प्रजाती त्यांनी सांगीतल्या. मगरींचा अधिवास हळू हळू नष्ट होण्याची कारणे त्यांनी सांगितली. पुराणामध्ये मगरींचे खूप महत्व आहे हे सांगताना त्यांनी मगरींचे पर्यावरणातील महत्व अधोरेखित केले. तसेच मगर आणि इतर प्राण्यांचा संवर्धनासाठी आणखी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे, असे सांगितले.

व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. एस. एम. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. विभागप्रमुख डॉ. एस. आर. यंकंची यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. एम. व्ही. वाळवेकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. ए. ए. देशमुख, डॉ. एन. ए. कांबळे, डॉ. एम. पी. भिलावे, डॉ. ए. डी. गोफणे आणि प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading