ध…. धन्य धन्य ती धरती
ज्या भूमीवर संत अवतरती
प्रथमतः धन्यवाद त्यांना
ज्यांच्यामुळेच तर आपल्या
जीवनाला आली गती
न्य….नसता जीवनात दुःखाला अंत
तर समजलीच नसती सुखाची किंमत
धन्यवाद त्या भगवंता
राखण्या जीवनाचा समतोल आता
वा…. वाचताना भगवत गीता
समजून जातात आयुष्यातील साऱ्या व्यथा
धन्यवाद त्या ब्रम्हांडनायका
ज्यांनी जगायला शिकवले स्वतः
द…. दरवळे गंध मनी पंचतत्वाचा
देह देऊनी शिकविले नाम
जपान तल्लीन व्हाया
धन्यवाद त्या अदृश्यरुपी शक्तीला
जिने घडविला मानव जन्म
भक्तीला धन्यवाद शब्दांमध्ये आहे
जणू भगवंताचे स्मरण
धन्यवाद शब्दामुळेच तर येते
आपल्यात शुद्ध आणि सात्विक आचरण….
मी हि धन्यवाद म्हणते…..
कारण या भगवंतामुळेच मला
कवी रुपी मन मिळते
आपण सर्वांनी ही मानूया
मग भगवंताचे आभार
त्यामुळेच तर झाला
आपला मानव जन्म साकार
धन्यवाद हे भगवंता चरणी
ठेवून या तुझ्या माथा
आज आणि आत्तापासून….
मीही सुरुवात करते
धन्यवाद म्हणायला स्वतः
कवयित्री – सौ निर्मला कुंभार
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.