राजा आणि नवाब ही ब्रश फुटेड कुळातील सुंदर दिसणारी पण दुर्मिळ आणि दुर्गम भागात दिसणारी फुलपाखरे… काही फुलपाखरांना मधुरस पिणे आवडत नाही त्यात यांचा समावेश होतो… कुजलेले खेकड्यांसारखे प्राणी, प्राण्यांच्या विष्ठा, शेण यातून हे रस शोषून घेतात..आणि पोषण द्रव्ये मिळवतात.. फुलपाखरांची नावं ठेवताना इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या काळातील राजे आणि नवाब यांची थट्टा उडवण्यासाठी घाणीवर बसणाऱ्या फुलपाखरांची अशी नावं ठेवली..परंतु आपल्या सौन्दर्यांच्या नजाकतीने ही फुलपाखरे खऱ्या अर्थाने फुलपाखरू जगताची राजे बनली आहेत…डोंगर दर्यात नद्यांच्या खोऱ्यात किंवा समुद्र सपाटीपासून उंच भागात ही फुल पाखरे दिसू शकतात.. कॉमन नवाब चे होस्ट प्लॅन्ट खैर वर्गातील वनस्पती (Acacia catechu ,Acacia torta, ) आणि गुलमोहोर कुळातील लाजरी Caesalpinia mimosoides, caesalpinia bonduc या आहेत.तर anomalous नवाब चे Acacia caesia आहे. टॉनी राजा आणि ब्लॅक राजाचे चिंच विलायती चिंच शिसम Dalbergia sissoo ही आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.