- संत गाडगे महाराज अध्यासनातर्फे संत ग्रंथ पुरस्कार योजना
- ३० डिसेंबरपर्यंत पुस्तक पाठवण्याचे आवाहन
- करवीर साहित्य परिषदेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील लेखकांसाठी पुरस्कार योजना
कोल्हापूरः संत गाडगे महाराज अध्यासनतर्फे राज्य पातळीवर संत ग्रंथ पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कार योजनेत संत साहित्याचा समावेश असून संत चरित्र, कथा, कादंबरी, काव्य, संशोधन आणि संकीर्ण ग्रंथांचा यामध्ये समावेश आहे. रोख एक हजार रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तरी इच्छुक साहित्यिकांनी १ जानेवारी २०२० ते ३० डिसेंबर २०२१ कालावधीत प्रकाशित झालेल्या संत ग्रंथांच्या दोन प्रती ३१ डिसेंबरपर्यंत प्राचार्य रा. तु. भगत, ‘शिवसुंदर’, मोहिते पार्क, रंकाळा (प.) कोल्हापूर या पत्त्यावर पाठवाव्यात.
कोल्हापूर जिल्ह्यातील लेखकांसाठी करवीर साहित्य परिषदेतर्फे पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी मराठी कथा, कादंबरी, काव्य व संकीर्ण अशा चार साहित्य प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. १ जानेवारी २०२० ते ३० डिसेंबर २०२१ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या दोन प्रती ३० डिसेंबरपर्यंत करवीर साहित्य परिषद, ‘शिवसुदंर’ मोहिते पार्क, रंकाळा (पश्चिम) या पत्त्यावर पाठवाव्यात. रोख एक हजार रुपये आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या संदर्भात परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील, असे परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य रा. तु. भगत यांनी कळविले आहे.