पुणे – मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे दरवर्षी संत साहित्यास पुरस्कार देण्यात येतात. या उपक्रमाचे यंदाचे हे २६ वे वर्ष असून त्यासाठी एकूण २६ पुस्तके परीक्षणासाठी संस्थेकडे आली होती. याचे परीक्षण डॉ. समिताताई टिल्लू आणि डॉ. माधवीताई महाजन या दोन परीक्षकांनी केले.
पुरस्कारासाठी निवडलेली पुस्तके अशी…
पहिल्या गट – चिंतनपर , विवेचनपर पुस्तके
प्रथम क्रमांक ( पुरस्कार रु. ८०००/- )
दासबोध सार – सर्वस्व श्रवण ते साक्षात्कार लेखक : श्रीमती संध्या अशोक कोल्हटकर , पुणे. प्रकाशक : गीतांजली प्रकाशन, छत्रपती संभाजी नगर .
द्वितीय क्रमांक ( पुरस्कार रु. ६०००/- )
संत कथासरिता लेखक : श्रीमती मीनाक्षी यशवंतराव देशमुख , अकोला. प्रकाशक : सत्या प्रकाशन, अकोला
तृतीय क्रमांक ( पुरस्कार रु. ४०००/- ) – विभागून
१) ज्ञानयोगी संत श्री धुंडा महाराज देगलूरकर लेखक : डॉ. रवींद्र बेम्बरे , देगलूर. प्रकाशक : स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे
२) मराठवाड्यातील संतांची विराणी : आकलन आणि चिंतन लेखक : डॉ. नामदेव सोडगीर, लातूर. प्रकाशक : छाया प्रकाशन, लातूर
विशेष पुरस्कार ( पुरस्कार रु. ३०००/- फक्त लेखकासाठी )
१) श्री ज्ञानेश्वरी व अमृतानुभावातील काही प्रतिमा एक चिंतन लेखक : श्यामा चातक देशपांडे, पुणे. संपादक : श्री. चातक बाबुराव देशपांडे, पुणे.
२) क्रांतिदर्शी तुकाराम लेखक : डॉ. संतोष देठे, चंद्रपूर. प्रकाशक : मेहेरबाबा पब्लिशर्स, नागपूर.
३) पावन पवित्र सार्थ श्रीज्ञानेश्वरी लेखक : लक्ष्मण सूर्यभान घुगे, पुणे. प्रकाशक : मुक्ता आर्टस् पब्लिकेशन, पुणे
दुसरा गट संत जीवन – ललित साहित्य ( पुरस्कार रक्कम रु. २०००/- प्रति पुस्तक )
१) समर्थ लेखक : मंजुश्री गोखले , कोल्हापूर. प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस प्रा. लि. , पुणे.
या पुरस्काराचे वितरण बुधवार सौर १ अग्रहायण शके १९४६ ( दि. २२ नोव्हेंबर २०२४ ) वार शुक्रवार या दिवशी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत मनोहर सभागृह , ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय , निगडी , पुणे ४४ येथे होणार आहे, अशी माहिती कार्यवाह म. व. देवळेकर यांनी दिली आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.