गोफणगुंडा
.
. 🌷 आली दिवाळी🌷
अच्छे दिनोंकी गात भूपाळी
आली दिवाळी आली दिवाळी
मेणबत्ती शोधारे आता
शोधा घासलेट चिमणी
बधीर होऊन फिरते आहे
गरिबाघरची रमणी
दिव्याविना रोज रडते
रात्र काळी-काळी
अच्छे दिनोंकी गात भूपाळी
आली दिवाळी आली दिवाळी
साखर झाली कडुईक
गोडेतेलाचा सामिल भडका
महागाईत तेल ओततो
जीएसटीचा रंगीन तडका
सोसा भोगा सरकार सांगे
लिहिले तुमच्या भाळी…
अच्छे दिनोंकी गात भूपाळी
आली दिवाळी आली दिवाळी
माणिकमोती पिकवुन
जरी कोंडला श्वास,
लढण्याची शिकलो कला मी
तोडुन टाकला गळफास
पावसाला आली दया
अन, हसली माती काळी
अच्छे दिनोंकी गात भूपाळी
आली दिवाळी आली दिवाळी
मनकी बात ऐकवून सदा
कसे जिरवले ठायी ठायी
देश, भक्ती, धर्मासाठी
कसे लढवले भाई भाई
पीएम देई सीएमला
हसतमुखाने टाळी
अच्छे दिनोंकी गात भूपाळी
आली दिवाळी आली दिवाळी