प्रत्येकाला आयुष्यात भेटतोच गुरु
तोच वाहून नेतो शिष्याचे तारु…
गुरु रचतात जीवनाचा पाया
म्हणून तर शिष्याची उजळती काया..
गुरु देतात ज्ञान ,शिक्षण
शिष्यांचे होते म्हणून रक्षण…
गुरु रचतात भविष्याचा पाया
शिष्यांना मिळते आयुष्य भर छाया..
गुरुजी देतात संस्कार छान
त्यांच्यामुळेच समाजात मिळे मान…
गुरु शिष्यांना लावतात लळा
म्हणून फुलतो ज्ञानाच मळा…
गुरुजी शिकवतात परीस्थितीशी लढायला
कधीच आवडत नाही त्यांना शिष्यांनी रडायला….
गुरुजी आहेत माझा खरा आदर्श
त्यांचा आहे माझ्या जीवनाला स्पर्श…
गुरुजी म्हणजे,प्रेम वात्सल्य
त्यांच्या पुढे होई श्रमाचे साफल्य…