September 9, 2024
Baap Poem by Govind Patil
Home » बाप
कविता

बाप

कर्जात जन्मलो आम्ही… हा गोविंद पाटील यांचा कवितासंग्रह लवकरच आपल्या भेटीला येत आहे. यातील ही कविता…

बाप

माझ्या रानच्या कुशीत
बैलजोडीला जपून…
माझा बाप झिजतो गा
उरी जखमा लिपून…..

घेतो नांगराशी झटी
अटीतटीची हाहून…
काळ्या आईच्या कंठात
येई हुंदका दाटून……

उफराट्या कष्टाला त्या
हासहासते दुनिया……
रगताच्या चिखलात
खुला रूजवितो दिया…..

अंकुराला फास येता
बाप लावी गळफास…..
भेगाळते जमीन जी
त्याचा दुखाची आरास….

गोविंद पाटील


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

वाचनसंस्कृती वटवृक्ष बहरण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत – युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती

आडवळणाच्या समाज व्यथाकथांचा प्रदेश

संत महात्म्यांचे यथार्थ दर्शन…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading