September 9, 2024
situation on rain in August September
Home » निम्मा संपला आता अर्ध्या पाणकळ्यातील पाऊस ?
गप्पा-टप्पा

निम्मा संपला आता अर्ध्या पाणकळ्यातील पाऊस ?

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

प्रश्न – आजपासून आठवडाभर महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी असेल ?

माणिकराव खुळे – गेल्या पाच दिवसात मान्सूनची सक्रियता चांगलीच जाणवली. आजपासून आठवडाभर म्हणजे मंगळवार (दि. १३ ऑगस्ट) पर्यन्त कोकण, विदर्भ, नाशिक सह खान्देश वगळता उर्वरित नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, व संपूर्ण मराठवाडा अश्या १४ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

परंतु
          i) नंदुरबार धुळे जळगांव नाशिक जिल्ह्यात मध्यम तर
          ii) विदर्भात जोरदार आणि
          iii)मुंबईसह कोकणात कोकणात अतिजोरदार पावसाची शक्यता मात्र आठडाभर जाणवते.

प्रश्न – ऑगस्ट मधील महाराष्ट्रातील पावसाचे ठळक वैशिष्ठ्ये काय आहेत ?

माणिकराव खुळे – महाराष्ट्रातील पावसाचे ठळक वैशिष्ट्ये अशी…

  • ‘ ऑगस्ट अखेरीसच ला- निना डोकावणार !’
  • ‘ ऑगस्टमध्ये पाऊस सरासरीच्या कमीच राहणार !
  • ‘नगर नाशिक, छ.सं.नगर मध्ये पावसाची परिस्थिती जैसे थे ! ‘
  • ‘ ऑगस्ट मध्ये विदर्भात ही पावसाची ओढ कायम राहणार !’
  • ‘ऑगस्ट मध्ये पाऊस पुन्हा घाटमाथ्यावरच अधिक ‘
  • .’धरण क्षेत्रात पावसाचा जोर टिकून राहणार !’
  • ‘ पुणे सातारा कोल्हापूर मधील धरणे ओसंडणार नद्या खळाळणार !’
  • ‘ना  ‘ला-निना’  ना  ‘आयओडी’, ऑगस्ट मध्ये पाऊस कमी.

प्रश्न – ऑगस्ट महिन्यातील देशाबरोबर महाराष्ट्रातील पावसासाठीही ‘ला-निना व आयओडी चा काय परिणाम जाणवेल ?

माणिकराव खुळे – 

ला- निना ‘-
               ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसच ‘ला-निना डोकावणार आहे. त्यामुळे ऑगस्टमधील एन्सो तटस्थेतील पहिले ३ आठवडे पावसासाठी अटकाव करणारे नसले तरी.ही स्थिती अधिक जोरदार पावसासाठी पूरकही नाही.

‘ आयओडी ‘ (भारत महासागरीय द्वि-ध्रुविता)
               – संपूर्ण ऑगस्ट व सप्टेंबर मधील दोन महिन्यात आयओडी तटस्थ राहणार आहे. त्यामुळे ऑगस्ट मधील पावसासाठी अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील पृष्ठभागीय पाण्याचे समान असणारी तापमानीय स्थिती पावसास अटकाव करणारी जरी नसली तरी महाराष्ट्रात सध्या अधिक पावसाची गरज असतांना ती पावसासाठी पूरकही जाणवत नाही.

प्रश्न – ऑगस्ट मधील तापमानाचा महाराष्ट्रातील पावसावर काय परिणाम जाणवेल?

माणिकराव खुळे –  कमाल तापमान-
 ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचे ३ वाजेचे कमाल तापमान हे ऑगस्ट मधील सरासरी कमाल तापमानापेक्षा पेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. म्हणजे दिवसाचे  तापमान अधिक म्हणून अधिक आर्द्तेची निर्मिती आणि त्यामुळेच केवळ काही भागातच ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते.

किमान तापमान
                       संपूर्ण महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पहाटे ५ चे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यतेमुळे अधिक आहे. म्हणजेच ऑगस्ट महिन्यात काही  पावसाळी भागाबरोबर काही भाग केवळ ढगाळच जाणवेल. एकूणच अश्या आभ्राच्छादित स्थितीतून किमान तापमानात वाढ जाणवणार आहे.

प्रश्न – ऑगस्ट मध्ये पावसाचे खंड असतील काय?

माणिकराव खुळे –  जेंव्हा ऑगस्ट मध्ये महाराष्ट्र व मध्य भारतात पावसाचा खण्ड येतो तेंव्हा –
       i) संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, केरळाच्या कोकणातील पश्चिम किनारपट्टीवरील तसेच
      ii) आसामकडील पुर्वोत्तरातील ७ राज्ये आणि
     iii) हिमालयाच्या पायाथ्यातील गंगेच्या खोरे प्रदेशातील सिक्कीम, हिमालयीन पश्चिम बंगाल शिवाय
     iv )बिहार झारखंड व तामिळनाडू व रायलसीमा भागात अधिक तीव्रतेने पाऊस होतो.
            ऑगस्ट महिन्यात वर स्पष्ट केलेल्या भागात पावसाची तीव्रता पाहता, महाराष्ट्रात पावसाचे खण्ड पडण्याची शक्यता कमीच जाणवते.

संपूर्ण ऑगस्ट महिन्यातील पावसाची स्थिती
अ) सरासरीपेक्षा अधिक(१०६% व अधिक)पावसाच्या शक्यतेतील ९ जिल्हे-
         पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव, लातूर, नागपूर

ब) सरासरीइतक्या(९६ ते १०४%)पावसाच्या शक्यतेतील ८ जिल्हे –
           नंदुरबार, जळगांव, जालना, बीड, नांदेड, परभणी, जालना, भंडारा

क) सरासरीपेक्षा कमी (९० ते ९५%)पावसाच्या शक्यतेतील १९ जिल्हे –
        धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सांगली, हिंगोली, तसेच  संपूर्ण विदर्भ (भंडारा व नागपूर वगळता) आणि कोकणातील पालघर, मुंबईशहर, मुंबई उपनगर, रायगड

 
प्रश्न – महाराष्ट्रात सप्टेंबर मधील पाऊस कसा असेल?

 माणिकराव खुळे – ‘ ला-निना’ च्या उपस्थितीत सप्टेंबर महिन्यात नाशिक व नगर असे दोन जिल्हे वगळता महाराष्ट्रातील उर्वरित ३४ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता जाणवते. नाशिक, नगर जिल्ह्यात मात्र मासिक सरासरीपेक्षा केवळ कमी पावसाची शक्यता आज तरी दिर्घपल्ल्याच्या अंदाजातील स्थितीनुसार जाणवते. अर्थात १ सप्टेंबर ला दिल्या जाणाऱ्या  सप्टेंबर महिन्याच्या मासिक अंदाजात ह्यात अधिक स्पष्टता जाणवेल, असे वाटते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

300 एकर जमीन क्षारपडमुक्त करण्याचा मानस

इथेनॉलवरील वस्तू, सेवा करात कपात

धनेश मित्र !

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading