December 10, 2022
stay-in-ice-hotel-zhukasarvi-sweden
Home » चक्क बर्फाच्या हॉटेलमध्येच मुक्काम ! (व्हिडिओ)
पर्यटन

चक्क बर्फाच्या हॉटेलमध्येच मुक्काम ! (व्हिडिओ)

इमारतच बर्फाची, जमीनही बर्फाची झोपायचे बेड, बसण्याच्या खुर्च्याही चक्क बर्फाच्या इतकेच काय खायच्या प्लेल्ट्स ही बर्फाच्या….विश्वास बसत नाही…मग जाणून घ्या आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांच्याकडून.स्विडनमधील किरुना शहराजवळ असलेल्या भव्य दिव्य आईस हॉटेलात डिसेंबरमध्ये त्यांनी दोन दिवसांचा मुक्काम केला होता. कशी असते या हॉटेलची रचना ? यासह त्यांचे चित्तथरारक अनुभव दुर्मिळ छायाचित्रांसह या व्हिडिओमधून…

स्वीडनमधील किरुना शहरापासून अवघ्या दहा-पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या झुकासार्वी गावातील भव्य-दिव्य आईस हॉटेलमध्ये दोन दिवसांचा मुक्काम करण्याचा योग आला. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आईस हॉटेल परिसरात मी व जयंती येऊन पोहोचलो तेव्हा उणे १५ अंश सेल्सिअसमध्ये हॉटेल उभारणीचे काम सुरु होते. दरवर्षी नोव्हेंबर अखेरपासून सुमारे 5500 चौरस मीटरच्या क्षेत्रात भव्यदिव्य हॉटेल बांधण्यात येते. मागणीनुसार विविध खोल्यांची संख्या ठरते. दिवसे-दिवस या हॉटेलला जगभरातून प्रचंड मागणी वाढत असल्याने निदान 70 ते 80 खोल्या बांधण्यात येतात. या खोल्यांसाठी तीन चार महिने अगोदरच बुकिंग करावे लागते. अन्यथा पर्यटकांना निराश होऊन परतावे लागते.

Related posts

निसर्गसंपन्न परिसरातील आटोपशीर किल्ला – कलानिधीगड

जाणून घ्या पृथ्वीच्या दक्षिण टोकाचे शेवटचे गाव…

गडकिल्ल्यांची अनोखी सफर

Leave a Comment