मुंबई : महाराष्ट्राच्या मातीतील एका प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित ‘झी स्टुडिओज्’, ‘चॉक अँड चीज फिल्म्स’ आणि ‘फिल्म जॅझ’ निर्मित ‘आता थांबायचं नाय !’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट १ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
वेगवान रस्त्यावरील एका भिंतीवर तीन ठसठशीत रंगांत लिहिलेले ‘आता थांबायचं नाय!’ हे शीर्षक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच स्फूर्ती देते. या प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमधून ऐकू येणारे जादुई संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करत कमालीचे आकर्षण तयार करीत आहे. दर्जेदार मराठी चित्रपट महाराष्ट्रातील रसिकांच्या मनामनात आणि घराघरात रुजवणाऱ्या ‘झी स्टुडिओज्’ची प्रस्तुती असलेली ही, या वर्षातील सर्वात मोठी घोषणा, ‘झी स्टुडीओज् मराठी’चे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी नुकतीच केली.
‘झी स्टुडीओज्’, ‘चॉक अँड चीज फिल्म्स’ आणि ‘फिल्म जॅझ’ निर्मित ‘आता थांबायचं नाय!’ या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकप्रिय अभिनेते शिवराज वायचळ यांनी केले आहे. प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रमुख भुमिकांमध्ये लोकप्रिय अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, श्रीकांत यादव, पर्ण पेठे, प्रवीणकुमार डाळिंबकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे तसेच एका खास भूमिकेत रोहिणी हट्टंगडी आणि एका कर्तबगार, संवेदनशील अधिकाऱ्याच्या भूमिकेत आशुतोष गोवारीकर यांना आपण पाहणार आहोत.
‘झी स्टुडिओज्’ प्रस्तुत ‘आता थांबायचं नाय!’ या चित्रपटाचे लेखन शिवराज वायचळ, ओमकार गोखले आणि अरविंद जगताप यांनी केले असून या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्माते उमेश के बन्सल(झी स्टुडिओज्), निधी परमार – हिरानंदानी(चॉक अँड चीज फिल्म्स’), क्रिएटिव्ह प्रोड्युसर – तुषार हिरानंदानी, धरम वालीया(फिल्म जॅझ) हे सर्व एकत्र आले आहेत.
( सौजन्य – राम कोंडू कोंडीलकर )
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.