बाय वन, गेट वन फ्री !
विचार केला तर ही एक व्यापारी संकल्पना वाटते, पण वास्तवात ती आपल्या जीवनाशीही निगडित व्यवस्था आहे.
जर आपण ‘राग’ घेतला,
तर आपल्याला ‘ॲसिडिटी’ फुकट मिळते.
जर आपण ‘ईर्ष्या’ घेतली,
तर आपल्याला ‘डोकेदुखी’ फुकट मिळते.
जर आपण ‘द्वेष’ घेतला,
तर आपल्याला ‘अल्सर’ फुकट मिळतो.
जर आपण ‘ताणतणाव’ घेतला,
तर आपल्याला ‘रक्तदाब (BP)’ फुकट मिळतो.
परंतु समजा
जर आपण ‘विश्वास’ घेतला,
तर आपल्याला ‘मैत्री’ फुकट मिळेल.
जर आपण ‘व्यायाम’ घेतला,
तर आपल्याला ‘उत्तम आरोग्य’ फुकट मिळेल.
जर आपण ‘प्रयत्न’ घेतला,
तर आपल्याला ‘समृद्धी’ फुकट मिळेल.
जर आपण ‘प्रामाणिकपणा’ घेतला,
तर आपल्याला ‘झोप’ फुकट मिळेल.
चला तर आता, आपण ठरवूया काय काय घ्यायचं ते….
पदलालची…