December 5, 2024
Cold will be felt again from Sunday Manikrao Khule Comment
Home » रविवारपासून पुन्हा जाणवणार थंडी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रविवारपासून पुन्हा जाणवणार थंडी

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

दोन दिवस, मुंबईसह दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तर १७ नोव्हेंबर पासून पुन्हा थंडीला सुरवात होईल. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात शनिवार  १६ नोव्हेंबर रोजी केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी झालाच तर नगण्य अश्या किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवते.

विशेषत: मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर ह्या जिल्ह्यातच हा परिणाम अधिक ह्या दोन दिवसात जाणवेल, असे वाटते. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक ह्या जिल्ह्यात मात्र हा परिणाम जाणवणार नाही.

ह्या निरभ्र आकाशामुळे सध्या सकाळ-संध्याकाळी जाणवणाऱ्या थंडीला, ह्या दोन दिवसात काहीसा विराम मिळेल, असे वाटते.           
                   
सध्या महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान ३३ तर पहाटेचे किमान तापमान २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असुन ही दोन्हीही तापमाने हे जवळपास सरासरीपेक्षा दोन अंशाने अधिक जाणवतात.

दक्षिणेकडील चार राज्यात होणाऱ्या पूर्वीय वाऱ्याच्या प्रणालीतून सध्या तेथे पडणाऱ्या पावसाचा परिणामातूनच मुंबईसह दक्षिण महाराष्ट्रात, १६ नोव्हेंबर पर्यंत ढगाळ वातावरणीय परिणाम जाणवणार आहे.            

रविवार दि. १७ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात  पुन्हा हळूहळू थंडीसाठीची स्थिती पूर्ववत होईल, असे वाटते, तसेच मुंबईसह कोकणातही त्यामुळे ढगाळ वातावरणही निवळेल, असे वाटते.              

ह्या नंतर, आजपासुन, पुढील दहा दिवस म्हणजे सोमवार दि.२५ नोव्हेंबरपर्यन्त चक्रीवादळाच्या बीजरोवणी साठीची कोणतीही वातावरणीय निर्मितीही दोन्हीही समुद्रात सध्या तरी जाणवत नाही. त्यामुळे दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातही थंडीसाठी अटकाव करणारा कोणताही वातावरणीय परिणाम जाणवणार नाही, असे वाटते..


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading