- संतोष जगताप, जगन्नाथ पाटील, दीपक पवार, अंजली ढमाळ, संपत मोरे आदींचा समावेश
- दोन जानेवारी २०२२ रोजी शाहु स्मारक भवन येथे पुरस्कार वितरण
- विजय चोरमारे, कृष्णात खोत, डॉ. प्रमिला जरग, दि. बा. पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०२० मधील ग्रंथ पुरस्कारासाठी संतोष जगताप, डॉ. जगन्नाथ पाटील, डॉ. दीपक पवार, सुचिता घोरपडे, अंजली ढमाळ, संपत मोरे आदींच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. दोन जानेवारी २०२२ रोजी पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.
पुरस्कार प्राप्त पुस्तके आणि लेखकांची नावे अशी –
१. देवदत्त पाटील पुरस्कार : विजेने चोरलेले दिवस – संतोष जगताप , (कादंबरी ),
२. शंकर खंडू पाटील पुरस्कार : खुरपं – सुचिता घोरपडे (कथासंग्रह),
३. अण्णा भाऊ साठे पुरस्कार : चंबुखडी ड्रीम्स – डॉ. जगन्नाथ पाटील (आत्मचरित्र),
४. कृ.गो.सूर्यवंशी पुरस्कार: महाराष्ट्र –कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प – डॉ. दीपक पवार ( संकीर्ण) ,
५ . शैला सायनाकर पुरस्कार : ज्याचा त्याचा चांदवा – अंजली ढमाळ (कवितासंग्रह),
६ .चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन) – मुलूखमाती –संपत मोरे (व्यक्तिचित्रण) आणि
७. बालवाड्मय पुरस्कार – भुताचं झाड – महादेव बुरुटे
विशेष पुरस्कार :
१. चंद्रकांत देशमुखे पुरस्कारः रिंगण – माधुरी मरकड ,
२. शाहीर कुंतीनाथ करके पुरस्कारः भेदिक शाहिरी – प्रा. आनंद गिरी,
३. बाळ बाबर पुरस्कार – त्रिवेणी –सुनील इनामदार
४. पधारो म्हारो देस – विष्णू पावले ,
५. मातेरं – डॉ.कृष्णा भवारी,
६. मजल दरमजल – आप्पासाहेब रेपे,
७. लॉकडाऊन – ज्ञानेश्वर जाधवर,
८. चैत्रचाहूल – योगिता राजकर,
९. रंकाळा – राजेंद्र पाटील,
१०.डोहतळ – मारुती कटकधोंड
११. कैवार – डॉ. शिवाजी शिंदे
१२. कोंडी – मधुकर फरांडे
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांसह सीमाभागातील मराठी लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. २०२० या वर्षातील ग्रंथ पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून विजय चोरमारे, कृष्णात खोत, डॉ.प्रमिला जरग, दि. बा. पाटील यांनी काम पाहिले.
पुरस्कार वितरण समारंभ रविवारी दोन जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे दमसाचे कार्याध्यक्ष प्रा. वि. द. कदम आणि सहकार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी दिली आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.