छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सयंमाची, निधड्या छातीच्या शूरांची, त्यांच्या पराक्रमाची एकनिष्ठतेची मूर्तिमंत गाथा म्हणजे पन्हाळाआणि याच पन्हाळ्यावर साजरी झाली यंदाची आगळी वेगळी आणि प्रकाशमय दिवाळी. कोल्हापूर हायकर्स यांनी ९ व्या वर्षी आयोजित केलेला हा सुंदर उपक्रम…यावेळी वाऱ्याला उत्तर देत अनेक दिव्यांनी गडावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या मंदिराचा परिसर उजळून निघाला. गडाच्या एकाकी दिसणाऱ्या रूपाला सोन्याची झळाळी मिळाली. मर्दानी खेळांचे तांडव, शाहिरांच्या वाणीतून ऐकलेला पोवाडा आणि हर हर महादेवच्या आरोळ्यांनी भारून गेलेला आसमंत.सगळंच अविस्मरणीय. मिनमिनत्या प्रकाशाने या अंधाराला उजळून टाकणारी ही छोटीशी पणती म्हणजे सकारात्मकतेचं प्रतीकआणि हीच सकारात्मकता आपल्या सर्वांच्या आयुष्यात भरून राहावी. या उद्देशाने सुदेश सावगावकर आणि गीता खुळे यांनी टीपलेले हे क्षण….
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.