वेगळे देश वेगळ्या वाटा
जगाच्या पाठीवरील विविध प्रदेश, तेथील संस्कृती जवळून पाहण्याचे स्वप्न लहानपणापासून उराशी बाळगले. परंतु चाकोरीबद्ध खर्चिक पर्यटनाऐवजी काहीशा हटके पद्धतीने जगभर भ्रमंती करण्याचे ठरवले.
आफ्रिकेच्या जंगलांमधील चित्तथरारकता, पेरू मधील गूढ रम्य माचू पिचू, दोन खंडांवर वसलेले अद्भुत इस्तंबूल, निसर्गाशी अव्याहत झुंजणारे नेदरलँड्स, बेभान करणारे न्यू ऑर्लिन्स, पर्यटनप्रिय थायलंड अनुभवता आले. सायकल, पायी, डोंगरभ्रमंती, बोटीने तर कधी मोटार, अशा विविध मार्गांनी स्थलदर्शन केले. बहुतांशी हॉस्टेलमध्ये मुक्काम केला. स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. या रोमांचकारी सफरींचा अनुभव शब्दात गुंफण्याचा हा प्रयत्न.
सुंदर जगाचा आस्वाद घेण्यासाठी मळलेल्या वाटांबरोबरच कधी कधी वेगळी वाट निवडावी. आशा करतो की यातील अनुभव मनोरंजनाबरोबर उपयुक्तही ठरतील.
गिरीश देसाई, अटलांटा, यु. एस. ए.
पुस्तकाचे नाव – वेगळे देश वेगळ्या वाटा
लेखक : गिरीश देसाई
किंमत : ₹ 280/-
पुस्तकासाठी संपर्क – 9960374739 (सहित वितरण)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.