February 1, 2023
God in Efforts Sanjay Dhangaval Poem
Home » प्रयत्नात परमेश्वर…
कविता

प्रयत्नात परमेश्वर…

प्रयत्नात परमेश्वर

प्रयत्नवादी माणूस
कधीच थांबत नाही
प्रयत्न करायचे सोडतं 
नाही
प्रयत्नाच्या वाटेवर
गर्दी कायम नसते 
वाट मोकळी झाली की
 मग पळायला 
मोकळे मैदान असते

प्रत्येक प्रयत्नासाठी
स्पर्धा असते
त्यात एक जागा दिसते
त्याच जागेवर एकाचा 
हक्क असतो
तोच हक्क मिळवण्यासाठी 
प्रयत्नाशिवाय पर्याय नसतो

अस म्हणतात की
प्रयत्नात परमेश्वर असतो
तेव्हा
पराभवाच्या पायघड्यांवर
फक्त चालतं रहायचे
पडता झडता आपले 
ध्येय शोधायचे
अपयश कितीही आले तरी
पळणाऱ्या पायाना 
कधीच थांबवायचं नाही
आणि मागे गर्दी किती
वळून बायचं नाही

जो गर्दीतून पुढे जातो
तो मागे कधीच रहात नाही
ध्येय डोळ्यासमोर ठेवले
तर त्याला पराभूत कोणीच करत नाही
कारण अपयशातून
यशाची सुरुवात होत असते
त्या सुरूवातीला कसलेच 
अवघड वळण नसते

अरे ज्यांना हरणे माहित नाही
ते फक्त  जिंकण्याचा  
विचार करतं असतात
विजय खेचून आणणारे
अर्ध्यावरून परत येत 
नसतात

म्हणून.....
आयुष्यात संघर्ष करताना
स्पर्धा असणारच आहे
पण जो थांबला तो संपला
जो धावला तो जिंकला

कवी - संजय धनगव्हाळ
मोबाईल - ९४२२८९२६१८

Related posts

आली किती दिसांनी ही पौर्णिमाच दारी..

येळकोट

आई…

Leave a Comment